Lokmat Sakhi >Food > क्रिस्पी कोथिंबीर वडी खायची आहे? मिसळा त्यात १ चमचाभर गोष्ट-न वाफवता वड्या होतील परफेक्ट

क्रिस्पी कोथिंबीर वडी खायची आहे? मिसळा त्यात १ चमचाभर गोष्ट-न वाफवता वड्या होतील परफेक्ट

Maharashtrian Kothimbir vadi : crispy and yummy Recipe : सणावाराला करा खुसखुशीत आणि खमंग कोथिंबीर वडी; सोपी रेसिपी - करा १५ मिनिटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2024 10:30 AM2024-03-25T10:30:10+5:302024-03-26T10:18:37+5:30

Maharashtrian Kothimbir vadi : crispy and yummy Recipe : सणावाराला करा खुसखुशीत आणि खमंग कोथिंबीर वडी; सोपी रेसिपी - करा १५ मिनिटात

Maharashtrian Kothimbir vadi : crispy and yummy Recipe | क्रिस्पी कोथिंबीर वडी खायची आहे? मिसळा त्यात १ चमचाभर गोष्ट-न वाफवता वड्या होतील परफेक्ट

क्रिस्पी कोथिंबीर वडी खायची आहे? मिसळा त्यात १ चमचाभर गोष्ट-न वाफवता वड्या होतील परफेक्ट

सणवार असो, किंवा कोथिंबीरची जुडी (Kothimbir Vadi) स्वस्त होणे. कोथिंबीर वडी खायला प्रत्येकाला आवडते. कोथिंबीर वडी करायला निमित्त लागत नाही, आणि कोथिंबीर वडी खायला कोणी नाही देखील म्हणत नाही (Cooking Tips and Tricks). कोथिंबीर खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पण जर मुलं कोथिंबीर खाताना नाकं मुरडत असतील तर, त्यांच्यासाठी खास कोथिंबीर वडी तयार करा (Kitchen Tips).

ताटात तोंडी लावण्यासाठी का असेना २ वड्या असतील तरी पुरेसं वाटतं. या धुलीवंदनानिमित्त जर आपल्याला कोथिंबीर वडी खायची इच्छा होत असेल तर, एकदा ही रेसिपी करून पाहा. बऱ्याचदा कोथिंबीर मऊ होते, त्यातील क्रिस्पीपणा गायब असतो. वड्या क्रिस्पी होण्यासाठी त्यात काय मिसळावे? वड्या करण्याची योग्य पद्धत कोणती पाहूयात(How to make maharashtrian kothimbir vadi recipe).

कोथिंबीर वडी करण्यासाठी लागणारं साहित्य

कोथिंबीर

लसूण

हिरवी मिरची

ओलं खोबरं

Holi Special : पुरण सैल-पोळी लाटताना फाटते? शेफ विष्णू मनोहर सांगतात खास ६ टिप्स; पुरणपोळी होतील परफेक्ट-चविष्ट

जिरं

हळद

मीठ

लिंबाचा रस

बेसन

तांदुळाचं पीठ

कृती

सर्वप्रथम, कोथिंबीर निवडून, धुवून मग छान बारीक चिरून घ्या. आता एक मिक्सरच्या भांड्यात एक वाटी किसलेलं खोबरं, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, ५ ते ६ लसणाच्या पाकळ्या, चमचाभर जिरं, चिमुटभर हळद, गरजेनुसार मीठ, अर्धा चमचा लिंबाचा रस घालून पेस्ट तयार करा.

उडीद डाळच कशाला? कपभर रव्याचे करा क्रिस्पी मेदू वडे; आतून सॉफ्ट-बाहेरून कुरकुरीत; करा १५ मिनिटात

आता कढईत २ ग्लास पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात खोबऱ्याची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, कपभर बेसन आणि एक मोठा चमचा तांदुळाचं पीठ घालून मिक्स करा. चमच्याने सतत मिक्स करा जेणेकरून बेसनाच्या गुठळ्या तयार होणार नाही. साहित्य एकजीव झाल्यानंतर ताटाला ब्रशने थोडे तेल लावून मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्या, त्यावर चमचाभर तीळ पसरवून थापून घ्या.

मिश्रण थंड झाल्यानंतर सुरीने त्याच्या वड्या पाडून घ्या. दुसरीकडे एका कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. मध्यम आचेवर गॅस ठेवा. नंतर त्यात वड्या सोडून सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्या. अशा प्रकारे आतून खुसखुशीत बाहेरून क्रिस्पी असे कोथिंबीर वडी खाण्यासाठी रेडी.

Web Title: Maharashtrian Kothimbir vadi : crispy and yummy Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.