Lokmat Sakhi >Food > ना बेसन -ना सोडा; ताज्या कोथिंबीरीची करा खमंग कोथिंबीर वडी, आतून मऊ बाहेरुन कुरकुरीत

ना बेसन -ना सोडा; ताज्या कोथिंबीरीची करा खमंग कोथिंबीर वडी, आतून मऊ बाहेरुन कुरकुरीत

Maharashtrian Kothimbir Vadi (Kothimbir Vadi Kashi kartat) : लहान मुलांनी कोथिंबीर खावी यासाठी तुम्ही ही सोपी आयडिया करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 09:49 AM2024-01-12T09:49:02+5:302024-01-12T14:55:59+5:30

Maharashtrian Kothimbir Vadi (Kothimbir Vadi Kashi kartat) : लहान मुलांनी कोथिंबीर खावी यासाठी तुम्ही ही सोपी आयडिया करू शकता.

Maharashtrian Kothimbir Vadi : Kothimbir Vadi Recipe Step By Step Recipe How to Make Kothimbir Vadi | ना बेसन -ना सोडा; ताज्या कोथिंबीरीची करा खमंग कोथिंबीर वडी, आतून मऊ बाहेरुन कुरकुरीत

ना बेसन -ना सोडा; ताज्या कोथिंबीरीची करा खमंग कोथिंबीर वडी, आतून मऊ बाहेरुन कुरकुरीत

हिवाळ्यात (Winter Special Recipe) तुम्हाला ताजी कोथिंबीर बाजारात सहज मिळेल या दिवसांत कोथिंबीर स्वस्तही असते. जास्तीची कोथिंबीर आणून तुम्ही  पटकन कोथिंबीर वड्या बनवू शकता. (Kothimbir Vadi Recipe Dakhva)अनेकजण पदार्थांवर घातलेली कोथिंबीर बाजूला काढतात किंवा  कोथिंबीर न घालता कोणताही पदार्थ खातात. (Kothimbir Vadi Easy Recipe)कोथिंबीरीचे शरीराला बरेच फायदे मिळतात. (Crispy Kothimbir Vadi) लहान मुलांनी कोथिंबीर खावी यासाठी तुम्ही ही सोपी आयडिया करू शकता. जर तुम्हाला कोथिंबीर वडी तळलेली नको असेल तर तुम्ही वाफवूनही खाऊ शकता किंवा कमी तेलात परतवून घेऊ शकता. (Coriander vadi recipe)

कोथिंबीर वडी करण्याची सोपी पद्धत (How to Make Kothimbir Vadi)

1) कोथिंबीर वडी करण्यासाठी सगळ्यात आधी कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्या. धुतलेल्या कोथिंबीरीतील पाणी निथळून बारीक चिरून घ्या. कोथिंबीर ताजी हिरवी असेल असं पाहा कारण तर पिवळ्या पानांची कोथिंबीर असेल किंवा कोथिंबीरीची पानं काळपट झाली असतील तर कडवट चव येऊ शकते.  १ ते २ जुडी कोथिंबीरीचा वापर तुम्ही कोथिंबीर वडीसाठी करू  शकता. 

राजस्थानी पद्धतीची ओल्या हळदीची भाजी करण्याची सोपी रेसेपी-तोंडाला येईल चव, पारंपरिक पौष्टिक पदार्थ

2) चिरलेली कोथिंबीर एका वाडग्यात काढून त्यात  कपभर बाजरीचे पीठ, अर्धी वाटी रवा, मीठ, हळद, तिखट, ओवा घालून पीठ घट्ट मळून घ्या. यात तुम्ही चण्याचे पीठही घालू शकता. पण सध्या हिवाळा सुरू असल्यामुळे  जर तुम्ही बाजरीचे पीठ यात वापरले तर वडी अधिकच पौष्टीक होईल.  बाजरीचे पीठ शरीराला उष्णता टिकवून ठेवते. याशिवाय यात फायबर्सचे प्रमाणही जास्त असते.  चण्याचे पीठ वापरल्यामुळे अनेकांना गॅसचा त्रास होतो हे टाळण्यासाठी  बाजरीचे किंवा ज्वारीचे पीठ हा उत्तम पर्याय आहे.

3) कोथिंबीर आणि बाजरीचे पीठ मळण्यासाठी पाण्याऐवजी ताकाचा वापर करा. ज्यामुळे चव दुप्पटीने वाढेल.  पीठ जास्त घट्ट किंवा पातळही मळू नये. या पीठाचे मध्यम आकाराचे  गोळे तयार करून घ्या. पोळपाट किंवा ताटात हा गोळा घेऊन त्याला लांबट आकार द्या.  लांबट आकाराचे कोथिंबीरीचे कणीक ताटात ठेवून वाफेवर शिजवून घ्या.  ८ ते १० मिनिटं वाफवल्यानंतर गॅस बंद करा.  

ऐश्वर्या नारकरचं ब्यूटी सिक्रेट, चमचाभर दुधाची साय आणि.. तिच्यासारखं रुप हवं तर करा हा उपाय

4) कोथिंबीरचे बॉल्स  थंड झाल्यानंतर त्याच्या बारीक वड्या चिरून घ्या. एका कढईत तेल मोहोरी, जीर तीळ, मिरची आणि चिमुटभर हळद घालून फोडणी तयार करा. तयार फोडणीत वाफवलेली कोथिंबीर  वडी घालून चमच्याच्या साहाय्याने मिश्रण एकजीव करून घ्या. तयार आहे कुरकुरीत खमंग कोथिंबीर वडी

Web Title: Maharashtrian Kothimbir Vadi : Kothimbir Vadi Recipe Step By Step Recipe How to Make Kothimbir Vadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.