Join us  

गावरान पद्धतीने करा लाल तिखट घालून चमचमीत पिठलं, चव अशी की येईल गावकडची आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2023 2:04 PM

Maharashtrian Pithla Recipe | Spicy and Tasty Besan Curry हिरव्या मिरचीचं आपण पिठलं तर खाल्लं असेल, आता लाल तिखटातलं चमचमीत पिठलं खाऊन पाहा..

पिठलं म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. गरमा - गरम भाकरी, पिठलं, हाताने फोडलेला कांदा त्यासोबत हिरवी मिरचीचा ठेचा खायला अनेकांना आवडते. पिठलं दोन प्रकारे केले जातात. एक म्हणजे लाल तिखटातलं चमचमीत पिठलं तर दुसरं म्हणजे हिरव्या मिरचीचा झुणका. महाराष्ट्रात पिठलं फार फेमस आहे.

घरात भाजी उपलब्ध नसेल तर, आपण पिठलं ही रेसिपी करू शकतो. ही रेसिपी कमी साहित्यात कमी वेळात तयार होते. व चवीलाही भन्नाट लागते. जर आपल्याला काहीतरी झणझणीत खाण्याची इच्छा झाली असेल तर, लाल तिखटातलं चमचमीत पिठलं ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पाहा. चला तर मग या झणझणीत पदार्थाची कृती पाहूयात(Maharashtrian Pithla Recipe | Spicy and Tasty Besan Curry ).

झणझणीत पिठलं करण्यासाठी लागणारं साहित्य

बेसन

तेल

जिरं

१ कप साबुदाणा - १ बटाटा, करा एकादशी स्पेशल साबुदाणा नगेट्स - साबुदाणा न भिजवता झटपट प्रकार

मोहरी

लसूण

कांदा

लाल तिखट

पाणी

मीठ

कृती

सर्वप्रथम, कढईत ३ चमचे तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी घाला, मोहरी छान तडतडली की त्यात जिरं, बारीक चिरलेला लसूण घालून मिक्स कर. लसणाला लालसर रंग आल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या. कांद्याला लालसर रंग आल्यानंतर त्यात ३ टेबलस्पून लाल तिखट, व चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य एकत्र मिक्स करा.

जेवताना तोंडी लावण्यासाठी करा कांद्याच्या ४ प्रकारच्या चटपटीत चटण्या, ५ मिनिटांत चविष्ट चटणी

मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात ३ कप पाणी घालून उकळी येण्यासाठी ठेवा. उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवा. व त्यात थोडं - थोडं चमच्याने बेसन पीठ घालून ढवळत राहा. जेणेकरून त्यात गुठळ्या जास्त तयार होणार नाही. शेवटी कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करा. अशा प्रकारे लाल तिखटातलं चमचमीत पिठलं खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स