Join us  

पुरणपोळी ना फाटणार, ना पुरण बाहेर येणार; पोळी लाटण्याची सोपी पद्धत-परफेक्ट बनेल पोळी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2023 3:10 PM

Maharashtrian Puran Poli Making tips : पुरणपोळी करण्यासाठी सारण तयार करण्यापासून, आवरणासाठी कणीक मळण्यापर्यंत अनेक कामं परफेक्ट करावी लागतात.

खास प्रसंगांना महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात पुरणाची पोळी बनवली जाते. जिभेवर ठेवताच पाणी होईल अशी पुरणपोळी खायला प्रत्येकालाच आवडते. (Puran poli) पुरणपोळी खायला जितकी चवदार चविष्ट लागते तितकीच ती बनवायलाही अवघड असते. (Puran Poli Recipe) पुरणपोळी करण्यासाठी सारण तयार करण्यापासून, आवरणासाठी कणीक मळण्यापर्यंत अनेक कामं परफेक्ट करावी लागतात. अन्यथा पोळी फुटू शकते किंवा मनासारखी चव लागत नाही. पुरणपोळी बनवण्याची सोपी-परफेक्ट रेसिपी पाहूया. (puran poli making method)

1) पुरणपोळीसाठी पुरण कसे तयार करावे? (What to do if Puran becomes dry)

एखाद्यावेळी चुकून पुरण सैल झाले तर पोळी करणं अवघड होतं. अशावेळी पुरण मंद आचेवर गरम करून घट्ट करून घ्या. ते गार झाल्यानंतर त्याचे गोळे बनवा. नॉन स्टिक कढईत मंद आचेवर परतून घेतल्यास पुरण पातळ होत नाही. पुरण सैल झाल्यास त्यात १ चिमुट सोडा घातल्यासही ते व्यवस्थित होतं. पुरण सैल वाटत असेल तर तुम्ही एका कॉटनच्या कापडावर ठेवू सकता जेणेकरून त्यात ओलावा राहणार नाही.

2) पुरण पोळी लाटण्याची सोपी पद्धत

पुरणपोळी करण्यासाठी सगळ्यात आधी  कणकेचा मध्यम आकाराचा गोळा तोडून त्यावर मध्यम आकारात लाटून घ्या. यावर पुरणाचा गोळा ठेवा. पुरण जास्त सुकलेलं नसावं. यासाठी तुम्ही मऊ हाताने वळता येईल इतकं मऊ पुरण ठेवा. पुरण जास्त सुकं असेल तर पोळी फाटण्याची शक्यता असते. गव्हाच्या पोळीवर पुरण ठेवल्यानंतर लाटलेल्या कणकेचा दुसरा भाग त्यावर ठेवा.  एका ग्लासच्या साहाय्याने व्यवस्थित दोन  भाग करून घ्या. 

त्यावर पीठ लावून पुरणपोळी लाटून घ्या. पुरणपोळी कडेने जास्त जाड ठेवू नका. पातळ लाटून शेकण्यासाठी तव्यावर घाला. पुरणपोळी तव्यावर घातल्यानंतर एका बाजूने थोडी शिजल्यानंतर उलटी करून घ्या. त्यावर तूप घाला नंतर पुन्हा दुसऱ्या बाजून शेका त्यावर तूप घालायला विसरू नका. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न