Join us  

करा कोबीच्या खमंग कुरकुरीत वड्या, कोण म्हणते कोबी बेचव लागते? मस्त झटपट रेसिपी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2023 5:32 PM

Maharashtrian Snack Recipe: How to Make Cabbage vadi, Note down Easy Recipe कोबीची भाजी आवडत नसली तरी कोबीच्या वड्या मात्र सर्वांना आवडतील..

कोबीपासून अनेक पदार्थ बनवले जातात. काहींना कोबी खायला आवडते तर काहींना नाही. कोबीची भाजी, कोबीची भजी, कोबीचे पराठे, अशा व अनेक प्रकारचे पदार्थ कोबीपासून बनवले जातात. कोबी हे फायबर, फोलेट, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वे ए आणि के तसेच इतर अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. कोबी रोगप्रतिकारशक्ती सुधारते. त्यात संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी आढळते. ही भाजी कच्ची, सॅलडच्या स्वरूपात आणि अगदी सूपच्या स्वरूपातही खाल्ली जाते.

आज आपण कोबी व ज्वारीच्या पिठाची कुरकुरीत वडी हा पदार्थ करणार आहोत. ही रेसिपी झटपट बनते. दररोजच्या पदार्थापासून काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, तर हा पदार्थ ट्राय करून पाहा. चला तर मग या हटके पदार्थाची कृती पाहूयात(Easy Way to Make Spicy Cabbage vadi).

कोबीची कुरकुरीत वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य

कोबी

कोथिंबीर

मीठ

तीळ

जिरं पावडर

धणे पूड

ओवा

बेकिंग सोडा

हळद

लाल तिखट

ज्वारीचं पीठ

बेसन

तांदळाचं पीठ

आलं - लसूण - मिरची पेस्ट

तेल

तीन डाळींचे सांडगे करण्याची पाहा पारंपारिक पद्धत, करायला सोपे आणि पौष्टिक

कृती

सर्वप्रथम, कोबी किसून किंवा बारीक चिरून घ्या. त्यात कोथिंबीर, मीठ, तीळ, जिरं पावडर, धणे पूड, ओवा, बेकिंग सोडा, हळद, लाल तिखट घालून मिश्रण मिक्स करा. आता त्यात ज्वारीचं पीठ, बेसन, तांदळाचं पीठ, मिक्स करा. शेवटी आलं - लसूण - मिरची पेस्ट आणि तेल घालून मिश्रण मळून घ्या.

आता हातावर तेल लावा, आणि मळलेल्या पीठाचे लांब गोळे तयार करून घ्या. आता हे गोळे एका भांड्यात किंवा इडली पात्रात चाळण ठेऊन चांगले वाफवून घ्या. वडे चांगले शिजले की नाही हे तपासण्यासाठी त्यावर चमचा किंवा टूथपिक घालून चेक करा.

गरमागरम कढीचा मारा भुरका! कढी स्वादिष्ट होण्यासाठी ३ टिप्स- खाणारे म्हणतील वाह..

आता वडी एका प्लेटमध्ये काढून घ्या. थंड झाल्यानंतर त्याचे काप करून घ्या. एकीकडे पॅन गरम करत ठेवा. त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात वडी तळून घ्या. अशा प्रकरे, कोबीचे खमंग वडी खाण्यासाठी रेडी. आपण या वड्यांचा आस्वाद चहा अथवा जेवणासोबत घेऊ शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स