Join us

हिरव्यागार कैरीचा आंबट - गोड चटपटीत ठेचा! भाकरी - वरणभातासोबत मनसोक्त खा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2025 17:00 IST

Kairicha Thecha Recipe : Raw Mango Thecha : How To Make Raw Mango Thecha : Maharashtrian Style Kairicha Thecha Recipe : नेहेमीचा तोच तो ठेचा करण्यापेक्षा यंदा, कैरीचा चटपटीत आंबट - गोड चवीचा ठेचा खाऊन तर पाहा...

उन्हाळा ऋतू म्हटलं की आपल्याला आठवतात त्या हिरव्यागार (Kairicha Thecha Recipe) आंबट - गोड चवीच्या कैऱ्या. सध्या बाजारांत प्रत्येक ठेल्यावर हिरव्यागार कैऱ्या (How To Make Raw Mango Thecha) विकायला ठेवलेल्या दिसतात. या हिरव्यागार, रसरशीत कैऱ्या पाहून त्या विकत घेण्याचा मोह कुणालाच आवरता येत नाही. एकदा का या कैऱ्या विकत आणल्या की मग किमान (Maharashtrian Style Kairicha Thecha Recipe) आठवडाभर तरी घरात या कैरीचे अनेक (Raw Mango Thecha) पदार्थ केले जातात. कैरीची चटणी, कैरीचे लोणचे किंवा मग कैरीचे काप करून त्यावर तिखट - मीठ लावून देखील खाल्ले जाते.

याच कैरीचा आपण मस्त चटपटीत आणि झणझणीत ठेचा देखील तयार करु शकतो. आपल्याकडे ठेचा हा शक्यतो भाकरी, चपाती किंवा वरण - भातासोबत तोंडी लावायला म्हणून खाल्ला जातो. परंतु नेहमीचा तोच तो मिरची शेंगदाणे वापरुन तयार केलेला ठेचा खाण्यापेक्षा आपण उन्हाळ्यात येणाऱ्या कैरीचा आंबट - गोड चटपटीत ठेच्याचा नवीन प्रकार नक्की ट्राय करून पाहू शकतो. कैरीचा ठेचा कसा करायचा याची सोपी रेसिपी पाहूयात.

साहित्य :-

१. कैरी - २ मध्यम आकाराच्या २. तेल - २ ते ४ टेबलस्पून ३. शेंगदाणे - १ कप ४. लसूण पाकळ्या - ५ ते ६ पाकळ्या५. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ मिरच्या ६. जिरे - १ टेबलस्पून ७. मीठ - चवीनुसार ८. कोथिंबीर - मूठभर

फक्त १० मिनिटांत मिक्सरमध्येच फिरवा ढोकळ्याचं पीठ, ढोकळा होईल कापसाहून हलका-जाळीदार परफेक्ट...

गारेगार लालचुटुक कलिंगडाचा गोळा घरीच करण्याची पाहा रेसिपी, इतकी भारी मजा येईल...

कृती :- 

१. सगळ्यात आधी कैरी स्वच्छ धुवून त्यावरील सालं काढून घ्यावी. सालं काढून घेतलेल्या कैरीचे लहान तुकडे करून घ्यावेत. २. आता एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात शेंगदाणे, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, जिरे घालून सगळे जिन्नस एकत्रित भाजून घ्यावेत. ३. सगळे जिन्नस हलके भाजून झाल्यावर त्यात सर्वात शेवटी कैरीच्या लहान फोडी घालाव्यात. २ ते ३ मिनिटे हलकेच परतून घ्यावे. 

फक्त १ वाटी साबुदाणा - बटाट्याचे करा चौपट फुलणारे, पळी पापड, उपवासाच्या कुरकुरीत पापडांची रेसिपी...

४. आता हे मिश्रण एका डिशमध्ये काढून थोडे थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर हे मिश्रण खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये घालूंन थोडे जाडसर वाटून घ्यावे. ५. मिश्रण थोडे वाटून घेतल्यावर त्यात चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालावी व पुन्हा एकदा खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये हलकेच वाटून भरड करून घ्यावी. 

कैरीचा चटपटीत आंबट - गोड चवीचा ठेचा खाण्यासाठी तयार आहे. आपण चपाती, भाकरी किंवा गरमागरम वरण - भातासोबत हा ठेचा तोंडी लावायला म्ह्णून खाऊ शकता.

टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशल