Join us  

खाऊन पाहा शेंगदाणा कूट घालून भरलेल्या शेवग्याच्या शेंगांची चमचमीत भाजी, पौष्टिक आणि चविष्टही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2023 11:10 AM

Maharashtrian style Stuffed dry drumstick recipe / sukha shevga शेवग्याच्या शेंगाची भाजी - सांबार खाऊन कंटाळलात, करून पाहा भरलेल्या शेवग्याच्या शेंग्यांची भाजी

निरोगी राहण्यासाठी आहारात नैसर्गिक गोष्टींचा समावेश असणं गरजेचं आहे. फळे, भाज्या, सुका मेवा, आरोग्यासाठी लाभदायक ठरते. ज्यात शेवग्याच्या शेंगांचा देखील समावेश आहे. शेवग्याच्या शेग्यांमध्ये अनेक पौष्टीक घटकांचा समावेश आहे. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, अमीनो अॅसिड, बीटा कॅरटीन, कॅल्शियम, फायबर, सोडियम यासह इतर पौष्टीक घटक आढळतात.

अनेक जण शेवग्याच्या शेंगांची आमटी, सांबार किंवा भाजी तयार करून खातात. पण आपण कधी भरलेल्या शेवग्याच्या शेंगांची भाजी तयार करून खाल्ली आहे का? शेवग्याच्या शेंगा आधीच आकाराने लहान आणि बारीक असतात, त्यामुळे शेवग्याच्या शेंग्यांमध्ये सारण भरायचे कसे? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. भरलेल्या शेवग्याच्या शेंग्यांची भाजी कशी तयार करायची, पाहूयात(Maharashtrian style Stuffed dry drumstick recipe / sukha shevga).

भरलेल्या शेवग्याच्या शेंग्यांची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य

शेवग्याच्या शेंगा

भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट

तीळ

शेवग्याच्या शेंगा खाण्याचे १२ फायदे! आरोग्यासाठी शेवगा म्हणजे वरदान, शेंगा रोज खा कारण..

ओलं खोबरं

मीठ

हळद

लाल तिखट

आलं - लसूण - मिरचीची पेस्ट

बेसन

तेल

नारळाचे दूध

कृती

सर्वप्रथम, भरलेल्या शेवग्याच्या शेंग्यांची भाजी करण्यासाठी सारण तयार करून घ्या. यासाठी एका बाऊलमध्ये एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घ्या. त्यात ४ चमचे तीळ, एक वाटी ओलं खोबरं, चवीनुसार मीठ, चिमुटभर हळद, एक चमचा लाल तिखट, आलं - लसूण - मिरचीची पेस्ट व २ चमचे बेसन घालून साहित्य एकजीव करून सारण तयार करा.

शेवग्याच्या शेंगा आधी धुवून घ्या, त्यावरील साल सुरीने काढून घ्या, व त्याचे बोटाच्या आकाराप्रमाणे काप करून घ्या. ज्याप्रमाणे आपण शेवग्याच्या शेंगांची आमटी किंवा भाजी करण्यासाठी शेंगा चिरतो, त्याच आकाराचे शेंगा चिरून घ्या. व मधोमध एक चीर पाडा. जेणेकरून त्यात सारण भरता येईल. चीर पाडल्यानंतर त्यात सारण भरा. व दोरीने शेंगा बांधून घ्या. ज्यामुळे शेंग्यांमधून सारण बाहेर पडणार नाही.

एक कप नेहमीच्या दुधाचा करा मस्त खरवस, इन्स्टंट खरवसाची सोपी रेसिपी

दुसरीकडे पॅनमध्ये २ चमते तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात भरलेल्या शेंगा घालून दोन्ही बाजूने भाजून घ्या. नंतर त्यात दोन कप नारळाचे दूध घाला. व त्यावर झाकण ठेऊन शेंगा शिजवून घ्या. भाजी शिजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून डिश सर्व्ह करा. आपण ही भाजी चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स