Lokmat Sakhi >Food > न वाफवता २० दिवस टिकणाऱ्या कोथिंबीर वडीची सोपी कृती पाहा, क्रिस्पी वडी-चवीला जबरदस्त

न वाफवता २० दिवस टिकणाऱ्या कोथिंबीर वडीची सोपी कृती पाहा, क्रिस्पी वडी-चवीला जबरदस्त

Maharashtrian tea time snack | crispy Indian kothimbir vadi will last long till 20 days : कोथिंबीर वडी थोड्या वेळानंतर मऊ पडते; 'या' पद्धतीने कोथिंबीर वडी करून पाहा..२० दिवस कुरकुरीत राहतील...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2023 01:15 PM2023-12-21T13:15:17+5:302023-12-21T13:22:00+5:30

Maharashtrian tea time snack | crispy Indian kothimbir vadi will last long till 20 days : कोथिंबीर वडी थोड्या वेळानंतर मऊ पडते; 'या' पद्धतीने कोथिंबीर वडी करून पाहा..२० दिवस कुरकुरीत राहतील...

Maharashtrian tea time snack | crispy Indian kothimbir vadi will last long till 20 days | न वाफवता २० दिवस टिकणाऱ्या कोथिंबीर वडीची सोपी कृती पाहा, क्रिस्पी वडी-चवीला जबरदस्त

न वाफवता २० दिवस टिकणाऱ्या कोथिंबीर वडीची सोपी कृती पाहा, क्रिस्पी वडी-चवीला जबरदस्त

कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi) कोणाला नाही आवडत. सध्या स्वस्तात मस्त कोथिंबीर बाजारात उपलब्ध आहे. पदार्थात चिरलेली कोथिंबीर घालताच जेवणाची चव दुपट्टीने वाढते. कोथिंबीरीला आपली एक वेगळीच चव आहे. घरातील गृहिणी कोथिंबीरीचा वापर विविध गोष्टींसाठी करतात. शिवाय कोथिंबीर खाण्याचे अनेक फायदे आहेत. विविध भागांमध्ये कोथिंबीर वडी करण्याची हटके पद्धती आपण पाहिल्यास असतील. काही जण वाफवलेली कोथिंबीर वडी तयार करतात. तर काही जण तेलात तळून भजी तयार करतात.

कोथिंबीर वडी कुरकुरीत होण्यासाठी आपण विविध उपाय करून पाहतो. पण काही वेळानंतर वडी सॉफ्ट होते. शिवाय वडीची चव देखील बिघडते. जर २० दिवस  टिकणारी कोथिंबीर वडी घरी तयार करायची असेल तर, एकदा ही कृती पाहा (Cooking Tips). आता तुम्ही म्हणाल २० दिवस कोथिंबीर कुरकुरीत कशी टिकेल. तर हो, काही टिप्सच्या मदतीने कोथिंबीर वडी अधिक दिवस आरामात टिकतील(Maharashtrian tea time snack | crispy Indian kothimbir vadi will last long till 20 days).

कुरकुरीत वडी करण्यासाठी लागणारं साहित्य

कोथिंबीर

बेसन

तांदुळाचं पीठ

ओवा

पांढरे तीळ

हळद

लाल तिखट

हिंग

आलं-लसूण पेस्ट

मीठ

झणझणीत मटार पोहे करण्याची चमचमीत रेसिपी, शक्ती कपूर म्हणतो मटार पोहे फार आवडतात कारण...

तेल

कृती

सर्वप्रथम, कोथिंबीर निवडून चिरून घ्या. आपण कोथिंबीर निवडताना त्याची देठ देखील घेऊ शकता. कारण कोथिंबीरीच्या देठांमध्येही स्वाद असतो. २ कप बारीक चिरलेली कोथिंबीर असेल तर, त्यात एक कप बेसन घाला. नंतर त्यात दीड चमचा तांदुळाचं पीठ घालून मिक्स करा. आपण तांदुळाच्या पीठाऐवजी ज्वारीचं पीठ देखील वापरू शकता. पीठ घातल्यानंतर त्यात एक चमचा ओवा, २ चमचे पांढरे तीळ, चिमुटभर हळद, एक चमचा लाल तिखट, चिमुटभर हिंग, अर्धा चमचा आलं-लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून हाताने सर्व जिन्नस एकजीव करा.

साहित्य एकजीव केल्यानंतर त्यात अर्धा कप पाणी घालून कणिक मळून घ्या. शक्यतो पाणी कमी घालण्याचा प्रयत्न करा. कारण कोथिंबीरीला पाणी सुटते, आणि बेसनात जास्त प्रमाणात पाणी घातल्याने पीठ गुळगुळीत तयार होते. कणिक मळून झाल्यानंतर शेवटी त्यावर एक चमचा तेल घालून पुन्हा मळून घ्या. ज्याप्रमाणे आपण चपाती तयार करण्यासाठी गोळा तयार करतो. त्याचप्रमाणे गोळा तयार करून घ्या. पोळपाटावर थोडं पीठ पसरवून त्यावर कणकेचा गोळा ठेवा. लाटण्याने जाडसर लाटून घ्या, व सुरीने त्याच्या वड्या कापून घ्या.

थंडीत करायलाच हवे टोमॅटो रस्सम, लालबुंद रसरशीत अस्सल रस्समची ही घ्या परफेक्ट रेसिपी

कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. कडकडीत तेल गरम झाल्यानंतर त्यात वड्या सोडून दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. वड्या तळून झाल्यानंतर टिश्यू पेपरवर काढून ठेवा. जेणेकरून त्यातील अतिरिक्त तेल निघेल. हवाबंद डब्यात साठवून ठेवल्यास कोथिंबीर वडी २० दिवसांपर्यंत आरामात टिकतील. अशा प्रकारे न वाफवता २० दिवस टिकणारे कोथिंबीर खाण्यासाठी रेडी.

Web Title: Maharashtrian tea time snack | crispy Indian kothimbir vadi will last long till 20 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.