महाराष्ट्रातील लोकांना जेवायला संपूर्ण अन्न लागतं. ज्यात डाळ - भात, भाजी - चपातीचा समावेश आहे. या पदार्थांशिवाय अनेकांना आपण जेवलो आहोत असे वाटत नाही. पण कधी - कधी हेच पदार्थ खाऊन कंटाळा देखील येतो. काहींचं फक्त डाळ - भात खाल्ल्याने देखील पोट भरतं. पण सतत डाळ - भात खाऊन देखील कंटाळा येतो.
डाळ ऐवजी आपण टोमॅटोचा रस्सा ट्राय करू शकता. टोमॅटोचा वापर अनेक भाज्या आणि फोडणीमध्ये केला जातो. टोमॅटोची आंबट - गोड चव प्रत्येकाला आवडते. टोमॅटोचे अनेक पदार्थ केले जातात. पण आपण कधी टोमॅटोचा रस्सा हा पदार्थ खाऊन पाहिला आहे का? टोमॅटोचा रस्सा ही रेसिपी कमी साहित्यात झटपट तयार होते. चला तर मग या चविष्ट आंबट - गोड चवीची पदार्थाची कृती पाहूयात(Maharashtrian Tomato Saar Recipe).
टोमॅटोचा रस्सा करण्यासाठी लागणारं साहित्य
टोमॅटो
पाणी
धणे
लसूण
किसलेलं खोबरं
लाल तिखट
हळद
मीठ
चिंच
‘बाँबे चटणी’ खाल्लीच नसेल तर काय मजा? २ चमचे पिठात होते झटपट चविष्ट चटणी
तेल
हिंग
मोहरी
कडी पत्ता
कृती
सर्वपथम, टोमॅटो चांगले धुवून त्याचे चौकोनी काप करून घ्या. दुसरीकडे एका पॅनमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात टोमॅटोचे काप घालून शिजवून घ्या. व शिजवलेले हे टोमॅटो मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. आता त्यात धणे, लसणाच्या पाकळ्या, किसलेलं खोबरं, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, चिंच घालून पेस्ट तयार करा.
भाजलेल्या शेंगदाण्याची सालं काढायला वेळ लागतो? शेफ रणबीर ब्रार सांगतात १ सोपी ट्रिक
आता कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात हिंग, मोहरी, कडीपत्ता, व टोमॅटोची तयार पेस्ट घालून मिश्रण एकत्र करा. त्यात थोडं पाणी घाला. व उकळी येण्यासाठी त्यावर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवा. अशा प्रकारे झणझणीत टोमॅटोचा रस्सा खाण्यासाठी रेडी.