हिवाळा सुरु झाला की बाजारात वांगी (Brinjal) मोठ्या प्रमाणात मिळतात. वांगी तशी बाराही महिने मिळतात. पण मकर संक्रांत झाल्यानंतर वांगी चवीला लागतात. वांग्याचे अनेक प्रकार आहेत. लहान वांग्यांचा वापर आपण भाजी, आमटी, भजी किंवा भरलं वांगं तयार करण्यासाठी करतो. तर मोठ्या वांग्याचा वापर आपण कापं किंवा भरीत करण्यासाठी करतो.
वांग्यामध्ये भरपूर प्रमाणत फायबर्स आढळतात. वांगी लो कॅलरीज, लो फॅटयुक्त असल्यामुळे शरीरासाठी फायदेशीर ठरतात (Vangyache Kaap). वांग्याचे काप हा पदार्थ महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय पारंपरिक पदार्थ आहे (Cooking Tips). हा पदार्थ कमी साहित्यात - झटपट तयार होतो. वरण भात, वांग्याचे काप असे झटपट जेवण सहज चविष्ट बनू शकते(Maharashtrian Vangyache Kaap | How to make Brinjal Fry).
वांग्याचे काप करण्यासाठी लागणारं साहित्य
वांगी
मीठ
कोथिंबीर
आलं
लसूण
हिरवी मिरची
हळद
धणे पूड
लाल तिखट
तांदुळाचं पीठ
रवा
तेल
कृती
सर्वप्रथम, मोठी जांभळ्या रंगाची वांगी धुवून घ्या. नंतर धारदार सुरीने वांग्याचे जाडसर काप करा. वांग्याचे काप काळपट पडू नये, म्हणून एका बाऊलमध्ये पाणी आणि चिमुटभर मीठ घालून मिक्स करा, त्यात वांग्याचे काप घालून ठेवा.
दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, आल्याचा तुकडा, ५ ते ६ लसणाच्या पाकळ्या, आणि हिरवी मिरची घालून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात चवीनुसार मीठ, चिमुटभर हळद, अर्धा चमचा धणे पूड, आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून मिक्स करा.
तांदुळात सतत पोरकिडे, अळ्यांचं साम्राज्य? ५ झटपट उपाय, तांदूळ टिकतील वर्षभर
तयार पेस्ट वांग्याच्या कापावर लावून कोट करा. दुसऱ्या एका प्लेटमध्ये अर्धा कप रवा, २ चमचे तांदुळाचं पीठ, अर्धा चमचा धणे पूड, चिमुटभर हळद, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. दुसरीकडे पॅनमध्ये ४ चमचे तेल घाला. वांग्याचे काप रव्याच्या मिश्रणात ठेवून, रवा दोन्ही बाजूने चांगले लावा. रवा लावून झाल्यानंतर काप तव्यावर ठेवा, व दोन्ही बाजूने खमंग सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. अशा प्रकारे चविष्ट कुरकुरीत खमंग वांग्याचे काप खाण्यासाठी रेडी.