Lokmat Sakhi >Food > Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला भगर खाल्ली तर चालते का? या उपवासाला काय खायचं काय टाळायचं

Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला भगर खाल्ली तर चालते का? या उपवासाला काय खायचं काय टाळायचं

Mahashivratri 2023 Mahashivratri Fasting Rules : महाशिवरात्रीच्या उपवासाला काय खावं, काय नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 12:46 PM2023-02-17T12:46:25+5:302023-02-17T13:37:02+5:30

Mahashivratri 2023 Mahashivratri Fasting Rules : महाशिवरात्रीच्या उपवासाला काय खावं, काय नाही?

Mahashivratri 2023 : Mahashivratri Fasting Rules Dos and don'ts to keep in mind while worshipping Lord Shiva | Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला भगर खाल्ली तर चालते का? या उपवासाला काय खायचं काय टाळायचं

Mahashivratri 2023 : महाशिवरात्रीला भगर खाल्ली तर चालते का? या उपवासाला काय खायचं काय टाळायचं

महाशिवरात्रीच्या दिवशी भारतभरातील शिवभक्त उपवास, पूजा करून देवाची उपासना करतात. यादिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता असं मानलं जातं.  यावर्षी (Mahashivratri 2023) १८ फ्रेबुवारीला महाशिवरात्र साजरी केली जाणार आहे. (Mahashivratri Fasting Rules)हा उपवास सफळ होण्यासाठी काय खायचं, काय खायचं नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. काहीजण निर्जळी हा उपवास करतात तर काहीजण फळं आणि दूध घेतात तर काहीजण भगर, रताळी, शिंगाड्याच्या वेगवेगळ्या पदार्थांचा आहारात समावेश करतात. (Mahashivratri Fasting Rules)

महाशिवरात्रीच्या उपवासाचे नियम

१) सकाळी उठल्यानंतर स्वच्छ धुतलेले कपडे घाला. घर शक्य तितकं स्वच्छ ठेवा. 

२)  या दिवशी काही भाविक निर्जळी उपवास करतात, तर काहीजण या दिवशी फळांवर राहतात. आपण आपल्या इच्छेनुसार उपवास करू शकता. 

४) फलाहार करून उपवास करणारे लोक दिवसभरात दूध, फळं यांचा आहारात समावेश करू शकतात.

५) महाशिवरात्रीच्या उपवासात तुम्ही फास्टिंग सॉल्ट म्हणजेच रॉक सॉल्ट वापरू शकता.

६) या उपवासाला तुम्ही साबुदाणा खिचडी, गव्हाच्या पिठाची पुरी, बटाट्याचा हलवा खाऊ शकता.

७) महाशिवरात्रीच्या उपवासाला बरेचजण भगर खाणं टाळतात.  त्याऐवजी तुम्ही नारळ, दूध, मसाला दूध, फळं, खजूर, अंजीर, चिक्की, शेंगदाण्याचा गूळ घालून केलेला हलवा, शिंगाड्याचं पीठ, खजूर, थालिपीठ,  साजूक तुपाचे लाडू हे पदार्थ खाऊ शकतात. 

 

Web Title: Mahashivratri 2023 : Mahashivratri Fasting Rules Dos and don'ts to keep in mind while worshipping Lord Shiva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.