Lokmat Sakhi >Food > Mahashivratri 2023 : उपवासाला प्या गारेगार थंडाई; शरीराला गारवा देणारी परफेक्ट-सोपी रेसिपी

Mahashivratri 2023 : उपवासाला प्या गारेगार थंडाई; शरीराला गारवा देणारी परफेक्ट-सोपी रेसिपी

Mahashivratri Special Thandai Recipe : शरीराला केवळ थंडावा मिळावा म्हणून नाही तर इतरही अनेक गोष्टींसाठी थंडाई आरोग्यदायी असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2023 09:50 AM2023-02-18T09:50:34+5:302023-02-18T09:55:01+5:30

Mahashivratri Special Thandai Recipe : शरीराला केवळ थंडावा मिळावा म्हणून नाही तर इतरही अनेक गोष्टींसाठी थंडाई आरोग्यदायी असते

Mahashivratri 2023 Thandai Recipe : Drink Thandai while fasting; A perfect easy Healthy recipe | Mahashivratri 2023 : उपवासाला प्या गारेगार थंडाई; शरीराला गारवा देणारी परफेक्ट-सोपी रेसिपी

Mahashivratri 2023 : उपवासाला प्या गारेगार थंडाई; शरीराला गारवा देणारी परफेक्ट-सोपी रेसिपी

उपवास म्हटला की वातूळ, तेलकट पदार्थ खाण्यात येतात आणि त्यामुळे नकळत आपल्याला अॅसिडीटी किंवा डोकेदुखी, उष्णता असे त्रास होण्याची शक्यता असते. मात्र उपवास करताना आहाराची योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास या त्रासांपासून आपण नक्कीच दूर राहू शकतो. थंडाई या पेयात औषधी गुणधर्म असल्यानं उन्हाळ्यात थंडाई पिण्याला खास महत्व आहे.  उन्हाचा त्रास कमी होण्यासाठी, डिहायड्रेशनचा धोका कमी करण्यासाठी उन्हाळ्याचा दिवसांत आवर्जून थंडाई प्यायली जाते. इतकेच नाही तर शरीराला ऊर्जा - पोषण देण्याचे काम ही थंडाई करते (Mahashivratri Special Thandai Recipe).

थंडाई केवळ थंडं पेय आहे असं नाही तर थंडाईमुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात त्यामुळे थंडाई उत्तम डिटॉक्स ड्रिंकदेखील आहे. थंडं दूध हे ॲण्टासिड म्हणून काम करतं, तसंच थंड दूध हे शरीराला थंड ठेवतं म्हणूनच नैसर्गिक घटकांनी पोषक हे पेय उन्हाळ्यात थंडं पेयं म्हणून प्यायलं जातं. थंडाईमुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढते, पचन सुधारते आणि हदयाच्या आरोग्यासाठीही थंडाई फायदेशीर ठरते. पाहूया ही थंडाई कशी करायची ..

(Image : Google)
(Image : Google)

साहित्य -

१. दूध - १ लिटर

२. साखर - १ वाटी 

३. बदाम - १५ 

४. काजू - १५ 

५. खसखस - १ चमचा

६. बडिशेप - १ चमचा 

७. वेलची पूड - अर्धा चमचा 

८. गुलकंद - २ चमचे  

कृती -

१. एका वाटीत बदाम, एका वाटीत काजू आणि एका वाटीत बडीशोप भिजत घालावी.

२. खसखस थोडी ओली करुन पाट्यावर बारीक करुन घ्यावी

(Image : Google)
(Image : Google)

३. २ तासाने बदामाची सालं काढून बदाम, काजू आणि बडीशोप मिक्सरमधून बारीक करुन घ्यावे

४. तापवून गार केलेल्या दुधात खसखस, मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट आणि गुलकंद घालावा. 

५.  मग यामध्ये साखर आणि वेलची पावडर घालून हे सगळे एकत्र करुन घ्यावे.

६. घट्टसर आवडत नसेल तर हे सगळे गाळून घ्यावे अन्यथा तसेच प्यायले तरी चालते.

७. फ्रिजमध्ये गार करायला ठेवून मग ही थंडाई प्यावी.

८. आवडीनुसार याच्यावर केशर, गुलकंदाच्या पाकळ्या असं काहीही घालू शकता. 
 

Web Title: Mahashivratri 2023 Thandai Recipe : Drink Thandai while fasting; A perfect easy Healthy recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.