Join us  

Mahashivratri Recipe : महाशिवरात्रीसाठी करा मस्त चटकदार फराळी मिसळ; मोठया उपवासाचा खास बेत! परफेक्ट मिसळची घ्या रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2022 12:25 PM

Mahashivratri Recipe : उपवासाला तेच ते खाऊन कंटाळा आला असेल तर ट्राय करा चटकदार उपवासाची मिसळ, ट्राय करा सोपी रेसिपी...

ठळक मुद्देउपवासाच्या दिवशी मिसळीची कमतरता भासू नये म्हणून खास रेसिपीउपवासाच्या दिवशी सतत तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला तर नक्की ट्राय करा फराळी मिसळ

उपवास असेल की साबुदाण्याची खिचडी ओघानेच आली. अगदीच नाही तर वरईची भगर आणि दाण्याची आमटी. पण नेहमी उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर थोडे हटके पदार्थ ट्राय करुन पाहूया की. मिसळ हा आपल्यातील अनेकांचा आवडीचा पदार्थ (Mahashivratri Recipe) . मिसळ म्हणजे काय तर अनेक गोष्टी एकत्र करुन केलेला चटपटीत पदार्थ. अशीच मिसळ आपण उपवासालाही करु शकतो. अगदी सोप्या पद्धतीने पण तितकीच चविष्ट लागणारी ही उपवासाची मिसळ कशी करायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही घ्या उपवासाच्या मिसळीची सोपी रेसिपी....

(Image : Google)

साहित्य - 

१. शेंगदाणे - १ वाटी उकडलेले, अर्धी वाटी भाजलेले किंवा तळलेले

२. साबुदाणा - २ वाट्या भिजवलेला 

३. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ 

४. जीरे - १ चमचा 

५. दही - १ वाटी

६  उपवासाची बटाटा भाजी - २ वाट्या

७. G2 कंपनीचा फराळी चिवडा  - १ वाटी 

८. दाण्याची आमटी - २ वाट्या 

९. मीठ - चवीनुसार 

१०. तूप - १ चमचा 

११. काकडी, डाळींब, द्राक्ष - आवडीनुसार  

(Image : Google)

कृती - 

1. तूप, जीरे आणि मिरची घालून साबुदाण्याची खिचडी करुन घ्यावी

2. उकडलेले दाणे, मिरची मीठ मिक्सरमधून वाटून त्याची आमटी करुन घ्यावी. या आमटीला तूप, आमसूलाची फोडणी घालावी.

3. बटाटे नुसते उकडलेले आवडत असतील तर नाहीतर फोडणी घालून भाजी करुन घ्यावी.

4. एका मोठ्या बाऊलमध्ये साबुदाणा खिचडी, त्यावर बटाटा भाजी आणि दाण्याची आमटी घालावी.

5. त्यावर गोडसर दही, G2 चा चटकदार फराळी चिवडा, भाजलेले दाणे आणि ओले खोबरे घालावे.  

6.आवडत असल्यास वर बारीक चिकलेली काकडी, डाळींबाचे दाणे किंवा द्राक्षाचे काप घालावेत. 

7. ही गरमागरम आंबट-गोड आणि थोडी तिखट चवीची मिसळ खायला अतिशय उत्तम लागते. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीमहाशिवरात्री