Join us  

महाशिवरात्रीला करा खमंग खुसखुशीत साबुदाणा वडा! तेल न पिणाऱ्या वड्यांची परफेक्ट रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 3:59 PM

Mahashivratri Special How to make sabudana vada : वडे तळण्यासाठी तेल खूप गरम असले पाहिजे, वडे कमी गरम तेलात टाकले तर तेल शोषून घेतात किंवा तेलात फुटतात. 

उपवासाला साबुदाण्याचे अनेक पदार्थ आवडीने खाल्ले जातात. काहीजण तर खास उपवासाच्या पदार्थांचा आस्वाद घेता यावा यासाठी उपवास करतात. (Sabudana Vada Recipe)  साबुदाणा वडा घरातील सगळेचजण आवडीनं खातात. पण काहीवेळा साबुदाणे व्यवस्थित  भिजले  नाहीत तर वडे फारच कडक होतात, तेल पितात तर कधी तेलात फुटतात. परफेक्ट साबुदाणा वडा करणं सगळ्यांनाच जमतं असं  नाही. (How to make sabudana Vada) महाशिवरात्रीला (Mahashivratri 2023)  उपवासाचे पदार्थ करत असताना तुम्ही साबुदाणा वडा ट्राय करू शकता. 

साहित्य

मध्यम आकाराचा साबुदाणा - 1 कप (150 ग्रॅम) भिजवलेला

बटाटे - 5 (300 ग्रॅम) उकडलेले

शेंगदाणे - ½ कप (100 ग्रॅम) भाजलेले आणि जाडसर दळलेले

कोथिंबीर पाने - 2-3 चमचे (बारीक चिरलेली)

सैंधव मीठ - दीड टीस्पून

हिरवी मिरची -  2 (बारीक चिरलेली)

आले पेस्ट - 1 टीस्पून

काळी मिरी - 8-10 (बारीक ठेचलेली)

तेल - तळण्यासाठी

कृती

1) 1 कप साबुदाणा 1 कप पिण्याच्या पाण्यात ३ ते ४ तास भिजवून ठेवा. साबुदाणा भिजवल्यानंतर जास्त पाणी दिसल्यास ते काढून टाका.  उकडलेले बटाटे सोलून चांगले मॅश करा.

2) साबुदाण्यामध्ये मॅश केलेले बटाटे घाला. त्यात मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आले पेस्ट, बारीक चिरलेली काळी मिरी, बारीक चिरलेले हिरवे धणे आणि दळलेले शेंगदाणे घाला आणि मिश्रण एकजीव करा. वडे बनवण्याचे मिश्रण तयार आहे.

3) कढईत तेल टाकून गरम करा. मिश्रण थोडं थोडं काढा, गोल आकार घ्या आणि तळहाताने दाबून चपटे करा आणि वडे गोल्डन, ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या.  तयार वडे प्लेटवर ठेवा,

4) याचप्रमाणे सर्व मिश्रणाचे वडे तयार करा. एक वडा गरम तेलात टाका, वडा व्यवस्थित शिजत असेल तर कढईत ३-४ वडे टाका आणि साबुदाणा वडे सोनेरी होईपर्यंत तळा. तळलेला साबुदाणा वडा नॅपकिन पेपरवर एका प्लेटवर पसरून ठेवा. त्याचप्रमाणे सर्व वडे तळा.

5) गरमागरम साबुदाणा वडे हिरव्या कोथिंबीरीची चटणी, गोड चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा आणि खा. वडे तळण्यासाठी तेल खूप गरम असले पाहिजे, वडे कमी गरम तेलात टाकले तर तेल आत शोषून घेतात किंवा ते तेलात फुटतात. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्नकिचन टिप्समहाशिवरात्री