Lokmat Sakhi >Food > Makar Sankranti 2022 : संक्रांतीसाठी लाडू- चिकी करताय, गूळ चांगला की भेसळयुक्त हे कसं ओळखाल? ‘अशी’ ओळखा भेसळ..

Makar Sankranti 2022 : संक्रांतीसाठी लाडू- चिकी करताय, गूळ चांगला की भेसळयुक्त हे कसं ओळखाल? ‘अशी’ ओळखा भेसळ..

Makar Sankranti 2022 : कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट सारखी घातक रसायने सहसा भेसळयुक्त गुळामध्ये मिसळली जातात. ज्यामुळे शरीराचं नुकसान होऊ शकतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 12:42 PM2022-01-13T12:42:37+5:302022-01-13T14:30:56+5:30

Makar Sankranti 2022 : कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट सारखी घातक रसायने सहसा भेसळयुक्त गुळामध्ये मिसळली जातात. ज्यामुळे शरीराचं नुकसान होऊ शकतं.

Makar Sankranti 2022 : How identify jaggery or jaggery pure or not know tricks | Makar Sankranti 2022 : संक्रांतीसाठी लाडू- चिकी करताय, गूळ चांगला की भेसळयुक्त हे कसं ओळखाल? ‘अशी’ ओळखा भेसळ..

Makar Sankranti 2022 : संक्रांतीसाठी लाडू- चिकी करताय, गूळ चांगला की भेसळयुक्त हे कसं ओळखाल? ‘अशी’ ओळखा भेसळ..

मकरसंक्रांतीला (Makar Sankranti 2022) लाडू  करण्यासाठी गूळ,  तीळ, शेंगदाणे या सामानाची जमवाजमव सुरू होते.  लाडू कोणतेही असो परफेक्ट लाडू बनवणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. गुळाचे शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. पण कोणताही पदार्थ  करण्यासाठी गूळ निवडताना तो चांगला की भेसळयुक्त हे पाहणं महत्वाचं. भेसळयुक्त आणि चांगल्या गुळातील फरक कसा ओळखायचा ? (Makar sankranti til ladoo making tips)

सध्या बनावट गूळ अनेक दुकांनांमध्ये विक्रीस ठेवला जातो. कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट सारखी घातक रसायने सहसा भेसळयुक्त गुळामध्ये मिसळली जातात. ज्यामुळे शरीराचं नुकसान होऊ शकतं.  कॅल्शियम कार्बोनेट गुळाचे वजन वाढवण्यासाठी, तर सोडियम बायकार्बोनेटचा वापर गुळाला योग्य रंग देण्यासाठी वापरले जाते.

 

गूळ चांगला आहे की भेसळयुक्त हे कसं तपासाल?

दुकानातील गुळाचां रंग पांढरा, हलका पिवळसर असेल तर बनावट गूळाचा काही भाग हा लालसर असेल. जर आपण असा भेसळयुक्त गूळ पाण्यात ठेवाल तर  त्यातील भेसळयुक्त पदार्थ हे भांड्याखाली बसतील, तर चांगला गूळ पाण्यात पूर्णपणे विरघळेल. चांगल्या गुळाची निवड करताना त्याचा रंग  पाहणं महत्वाचं असतं. नेहमीच पिवळ्या गुळापेक्षा तपकिरी रंगाच्या गुळाचा वापर करा. 

तिळाचे लाडू दात तुटून हातात येतील एवढे कडक होतात? ही पद्धत वापरा, लाडू खाताना सहज तुटतील

भेसळयुक्त गूळ हा पिवळसर किंवा फिक्कट तपकिरी रंगाचा दिसतो.  ऊसाच्या रसातील अशुद्धतेमुळे आणि उकळल्यामुळे रासायनिक प्रक्रिया होऊन, गुळाचा रंग गडद लाल किंवा तपकिरी होतो. यानंतर, त्यात काही नैसर्गिक गोष्टी मिसळून त्यातील अशुद्धता दूर केल्या जातात.

डाळ कधी गचकी होते तर कधी कच्ची राहते?  कुकरमध्ये डाळ शिजवताना टाळा या चुका

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड रेग्युलेशन २०११ च्या कायद्यानुसार या पिवळ्या व स्वच्छ दिसत असलेल्या गुळात  जास्तीत जास्त ७० पीपीएम इतके सल्फर डाय ऑक्साईड वापरण्यास परवानगी आहे.  याच रसायनाचा अधिक वापर जीवघेणा ठरू शकतो. केमिकल्सचा वापर न करता तयार केलेला सेंद्रीय गुळ शरीरासाठी गुणकारी ठरतो. पण अधिक फायदा मिळवण्यामुळे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जातो. 

Web Title: Makar Sankranti 2022 : How identify jaggery or jaggery pure or not know tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.