Join us  

Makar Sankranti 2023 : भोगीच्या दिवशी खिचडी का खातात? खिचडी खाण्याचं खास कारण आणि महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 1:24 PM

Makar Sankranti 2023 : वजन कमी करण्यात प्रोटिन्सयुक्त खिचडी फायदेशीर ठरते. यामुळे मेटाबॉलिझ्म वाढतो

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १५ जानेवारी  २०२३ ला मकर संक्रांतीचा (Makar Sankrati 2023)  सण  साजरा केला जाणार आहे. ज्योतिष शास्त्राअनुसार जेव्हा सुर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रात साजरी केली जाते. संक्रांतीच्या आदल्या दिवशी खिचडी खाण्याचं खास महत्व आहे. (Makar Sankranti Khichdi Benefits)  हिंदी भाषिक देवाला नैवेद्य अर्पण करणे, याला भोग चढवणे असे म्हणतात. त्यानुसार आपण कमावलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना करावी,

या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी (यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात.) तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे. 

खिचडी खाण्याचे फायदे

१) डाळ,  तांदूळ, भाज्या आणि मसाल्यांपासून तयार करण्यात आलेली खिचडी खूपच चविष्ट आणि पोषणयुक्त असते. यामुळे शरीरालाा पुरेपूर उर्जा मिळते. 

२) पचनशक्ती कमकुवत झाल्यास हा आहार पचायला जड जातो आणि पचनक्रीया चांगली राहते. म्हणूनच आजारी व्यक्तींना खिचडी खाण्याचा सल्ला दिला जातो. 

३) गर्भावस्थेत अनेक महिलांना गॅस, अपचनाचा त्रास उद्भवतो. अशा स्थितीत खिचडी खाणं फायदेशीर ठरतं. यामुळे पोट जड वाटत नाही आणि खाल्लेलं अन्न लवकर पचण्यास मदत होते. 

४) वजन कमी करण्यात प्रोटिन्सयुक्त खिचडी फायदेशीर ठरते. यामुळे मेटाबॉलिझ्म वाढतो. बोल मुव्हमेंट योग्य पद्धतीनं होते. बराचवेळ  पोट भरलेलं राहतं आणि क्रेव्हींग्स होत नाहीत. यामुळे एनर्जी वाढण्यास मदत होते. 

५) उशीरा जेवल्यानं किंवा जास्त जेवण झालं तर गॅस  एसिडीटीचा त्रास होतो. खिचडीचे सेवन केल्याने या सर्व समस्या टाळण्यास मदत होते. खिचडीचे सेवन केल्यानं पोट फुगण्याची समस्या उद्भवत नाही आणि अॅसिडिटी देखील टाळता येते.

टॅग्स :मकर संक्रांतीहेल्थ टिप्सअन्न