Join us

'भोगीची भाजी' करताना 'हे' पदार्थ आवर्जून घाला, भाजी होईल चमचमीत- घ्या चवदार रेसिपी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2025 15:29 IST

Bhogichi Mix Bhaji Recipe In Marathi: अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ही भोगीची मिक्स भाजी केली तरी तिची चव अगदी परफेक्ट होईल (Makar Sankranti 2025 Special), बघा सोपी रेसिपी...(How to make mix bhaji for bhogi?)

ठळक मुद्देमिक्स भाजी करताना काय काळजी घ्यावी याविषयीच्या या काही टिप्स..

मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी सगळ्या भाज्या घालून मिक्स भाजी केली जाते (Makar Sankranti 2025 Special). या ऋतूमध्ये मिळणाऱ्या जास्तीतजास्त हंगामी भाज्या घालून ही भाजी तयार होते. पण बऱ्याचदा भाज्यांचं प्रमाण चुकलं तर मिक्स भाजीची चव बिघडते. कधी कधी एखादा पदार्थ खूपच उग्र लागतो तर कधी कधी भाजीला चांगला स्वाद येतच नाही (bhogichi mix bhaji recipe in Marathi). असं होऊ नये म्हणून नेमकं काय करावं आणि मिक्स भाजी करताना काय काळजी घ्यावी याविषयीच्या या काही टिप्स..(How to make mix bhaji for bhogi?)

भोगीची मिक्स करण्याची रेसिपी

 

साहित्य 

१ वाटी मटार

अर्धी वाटी कोवळे हरबरे

अर्धी वाटी ताजी तूर

त्वचेचं तारुण्य टिकविण्यासाठी 'या' पद्धतीने वापरा लवंग! वय वाढलं तरी त्वचा सुरकुतणार नाही...

पाव वाटी वालाच्या शेंगा

अर्धी वाटी भिजवलेले शेंगदाणे

अर्धी वाटी घेवड्याच्या शेंगा

अर्धी वाटी गाजराचे तुकडे

एकेक वांगं, बटाटा, कांदा आणि टोमॅटो

५ ते ६ बोरं

ऊसाचे छोटे छोटे ५ ते ६ तुकडे

 

वाटण करण्यासाठी २ चमचे किसलेलं खोबरं, १ चमचा धने, अर्धा चमचा जीरे, २ चमचे पांढरे तीळ, १ टीस्पून खसखस, १० ते १५ लसूण पाकळ्या, अर्धा चमचा आल्याचे तुकडे, २ टेबलस्पून कोथिंबीर, ८ ते १० कडिपत्त्याची पाने, ३ ते ४ हिरव्या मिरच्या.

चवीनुसार लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ 

भोगीला तिळाचे उटणे लावून आंघोळ करण्याचे फार महत्त्व! सौंदर्य खुलविण्यासाठी 'असे' वापरा तीळ 

कृती

सगळ्यात आधी कढई गॅसवर गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून सगळ्या भाज्या परतून घ्या. 

वाटण करण्यासाठीचे जे पदार्थ आहेत ते थोडेसे भाजून घ्या आणि थंड झाल्यावर मिक्सरमधून फिरवून त्याचं बारीक वाटण करून घ्या. 

 

आता कुकर गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात थोडं तेल घालून फोडणी करून घ्या. यानंतर वाटण घाला आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्या. त्यामध्ये तिखट, गरम मसाला घाला. वाटणाला पाणी सुटलं की मग परतून घेतलेल्या भाज्या घाला. थोडेसे तीळ घाला आणि भाज्या बुडतील एवढं पाणी टाका.

मकर संक्रांत: वॉर्डरोबमध्ये असायलाच पाहिजेत काळ्या साड्यांचे 'हे' प्रकार, बघा सुंदर देखण्या साड्यांचा रुबाब

चवीनुसार मीठ घालून कुकरचं झाकण लावून घ्या आणि एक शिट्टी होऊ द्या. अतिशय चवदार अशी भोगीची भाजी झाली तयार.. कुकरच्या जास्त शिट्ट्या घेणं टाळावं कारण मग भाज्या गरजेपेक्षा जास्त शिजून गचका होतात आणि मग भाजीची चव जाते. 

 

टॅग्स :मकर संक्रांतीअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीभाज्या