Join us

तिळाचे लाडू करण्याची सगळ्यात सोपी रेसिपी, फक्त १० मिनिटांत करा किलोभर तिळाचे लाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2025 13:18 IST

Makar Sankranti 2025 Special Til Gul Laddu: पाक न करताही तिळाचे लाडू अतिशय चवदार करता येतात. ते कसे करायचे त्याचीच ही खास आणि एकदम सोपी रेसिपी..(how to make til gul ladoo?)

ठळक मुद्देकोणताही पाक न करता अतिशय सोप्या पद्धतीने कमीतकमी वेळात तिळाचे लाडू कसे करायचे ते पाहूया..

मकर संक्रांतीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे घरोघरी तिळाचे लाडू करण्याची तयारी सुरू झाली आहे (Makar Sankranti 2025 Special Til Gul Laddu). तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या असं काय काय करता येतं. पण साखरेचा किंवा गुळाचा पाक करून हे सगळे पदार्थ करायचे म्हटले तर त्यात खूप वेळ जातो. शिवाय पाक परफेक्ट जमायला हवा (how to make til gul ladoo?). त्यात काही कमी जास्त झालं तर वड्यांची किंवा लाडूची सगळी मजाच जाते. म्हणूनच आता कोणताही पाक न करता अतिशय सोप्या पद्धतीने कमीतकमी वेळात तिळाचे लाडू कसे करायचे ते पाहूया..(most easy and quick recipe of making til gul laddu)

बिनापाकाचे तिळाचे लाडू करण्याची रेसिपी

 

साहित्य

२ वाट्या तीळ

पाऊण वाटी शेंगदाणे

दिड वाट गूळ

मकर संक्रांत: काळ्या साडीवर करा सुपर स्टायलिश लूक! ७ टिप्स, सगळ्यांमध्ये तुम्हीच उठून दिसाल..

४ ते ५ टेबलस्पून गुळ

१ टीस्पून वेलची आणि जायफळ पावडर

कृती

सगळ्यात आधी तर गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये तीळ टाकून ते थोडे भाजून घ्या. तीळ भाजून घेतल्यानंतर ते एका पसरट भांड्यात काढून ठेवा.

 

त्यानंतर कढईमध्ये शेंगदाणे टाका आणि भाजून घ्या. तीळ आणि शेंगदाणे भाजताना गॅस नेहमी मंद किंवा मध्यम आचेवर असावा. शेंगदाणे भाजल्यानंतर ते ही कढईतून बाहेर काढून घ्या आणि थोडे थंड झाल्यावर त्याची टरफलं काढून घ्या.

तीळ आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून त्याचा बारीक कूट करून घ्या.

बाथरुमच्या टाईल्स काळपट- पिवळट झाल्या? करा 'हा' सोपा उपाय- कमी मेहनतीत टाईल्स चकाचक.. 

तीळ आणि शेंगदाण्याचा कूट एका भांड्यात घ्या. त्यामध्ये वेलची पावडर, जायफळ पावडर, बारीक किसलेला गूळ आणि थोडं गरम केलेलं तूप घाला. सगळे पदार्थ व्यवस्थित कालवून एकजीव करा आणि त्याचे तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे लाडू वळा..

जर लाडूचं मिश्रण तुम्हाला थोडं कोरडं वाटलं तर त्यात गरजेनुसार तूप घाला. 

 

टॅग्स :मकर संक्रांतीपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.अन्न