ज्वारी आणि तांदुळाची भाकरी आपण वर्षभर खातो. पण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीनिमित्त तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची चविष्ट भाजी जबरदस्त लागते. भोगीच्या दिवशीचे जेवण महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळे असते. काही भागात बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी हमखास केली जाते. पण भोगीला बाजरीची भाकरी का खाल्ली जाते? बाजरीची भाकरी खाण्याचे महत्त्व काय? याबद्दलची माहिती आपल्याला आहे का?
बाजरी हा उष्ण पदार्थ आहे आणि थंडीमध्ये बाजरी खाणे उत्तम मानले जाते. बाजरी खाण्याचे अनेक फायदे आहेत. बाजरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम जास्त प्रमाणात आढळते, जे हृदयासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे यंदा भोगीनिमित्त जरूर बाजरीची भाकरी करून खा. पण बऱ्याच गृहिणींना बाजरीची भाकरी करायला जमत नाही. सोप्या पद्धतीने तीळ लावून बाजरीची भाकरी करायची असेल तर, एकदा या रेसिपीला फॉलो करून पाहा. टम्म फुगलेल्या भाकऱ्या परफेक्ट जमतील(Makar Sankranti Special: How To Make Til Bajarichi Bhakri).
तीळ लावून बाजरीची भाकरी करण्यासाठी लागणारं साहित्य
बाजरीचं पीठ
तीळ
काकडीचे थालीपीठ करण्याची झटपट रेसिपी, भाजणीच्या थालीपीठसारखेच खमंग पौष्टिक - नाश्ता चमचमीत
मीठ
पाणी
कृती
सर्वप्रथम, परातीमध्ये कपभर बाजरीचे पीठ घ्या. पीठ ताजं दळलेलं असावं याची खात्री करून घ्या, कारण पीठ एक ते दोन आठवड्यांपूर्वीचं असेल तर, पिठाची चव कडवट लागू शकते. पिठात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. नंतर गरजेनुसार थोडे-थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. पीठ मळत असताना जास्त पाणी ओतू नका. पीठ मळण्यासाठी आपण गरम पाण्याचा देखील वापर करू शकता. जेणेकरून भाकऱ्या मऊ तयार होतील.
स्वयंपाकाला फार तेल लागतं? ५ टिप्स- कमी तेलात भाज्या होतील चमचमीत, वडे-पुऱ्याही फुगतील टम्म
पीठ मळून झाल्यानंतर मध्यम आकाराचे गोळे तयार करा. नंतर परातीमध्ये थोडे बाजरीचं पीठ शिंपडा. जेणेकरून गोळा थापताना परातीवर चिकटणार नाही. हलक्या हाताने आपण भाकरी थापून तयार करू शकता. भाकरी थापताना त्यावर तीळ लावायला विसरू नका. जर आपल्याला भाकरी थापून तयार करायला जमत नसेल, किंवा तुटत असतील तर, आपण लाटूनही भाकरी तयार करू शकता.
दुसरीकडे लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवा. गॅसची फ्लेम हाय ठेवा. तवा गरम झाल्यानंतर हलक्या हाताने भाकरी उचलून, पीठ लागलेली बाजू वर ठेवून भाकरी तव्यावर पसरवून घाला. वरील बाजूस थोडे पाणी लावून दोन्ही बाजूने भाकरी भाजून घ्या. अशा प्रकारे भोगी स्पेशल बाजरीची भाकरी खाण्यासाठी रेडी.