Join us  

तोंडात टाकताच विरघळेल अशी तिळाची मऊसूत बर्फी- सगळ्यांनाच आवडेल असा खास पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2024 5:26 PM

Makar Sankranti Special Til Barfi Recipe: तिळाची वडी नेहमीचीच, आता तिळाची बर्फी करून पाहा... सगळ्यांनाचा आवडेल असा वेगळा पदार्थ, बघा सोपी रेसिपी (sesame barfi recipe for makar sankranti in marathi)

ठळक मुद्देआता या संक्रांतीला तुमच्या घरी नेहमीचे तेच ते पदार्थ करण्यापेक्षा तिळाची बर्फी हा एक थोडा वेगळा पदार्थ करून पाहा

संक्रांतीला तिळाची वडी, तिळगुळाचे लाडू, तिळाची पापडी किंवा पोळी असे पदार्थ सगळेच जण करतात. बऱ्याचदा तर तेच ते एकसारख्या चवीचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. म्हणूनच आता या संक्रांतीला तुमच्या घरी नेहमीचे तेच ते पदार्थ करण्यापेक्षा तिळाची बर्फी (tilachi barfi recipe) हा एक थोडा वेगळा पदार्थ करून पाहा (How to make til barfi?). अतिशय मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळेल अशी तिळाची बर्फी कशी करायची ते आता पाहूया...(sesame barfi recipe for makar sankranti in marathi)

 

साहित्य

१ कप तीळ

१ कप तूप

पुरुषांना तरी मनातलं बोलण्याचं, रडण्याचं स्वातंत्र्य कुठं आहे?- मिथिला पालकर सांगते अवतभवतीच्या पुरुषांची घुसमट

१ कप गव्हाचं पीठ

१ कप गूळ

२ टीस्पून खसखस

१ टीस्पून वेलची पावडर

पाव टीस्पून सुंठ पावडर

पाव टीस्पून जायफळ

 

कृती 

सगळ्यात आधी एका पॅनमध्ये मध्यम आचेवर तीळ भाजून घ्या. त्यानंतर ताटात काढून पुर्णपणे थंड करून घ्या. तीळ थंड झाले की मिक्सरमध्ये टाकून त्याचा कूट करून घ्या.

खास हिवाळ्यासाठी फुल स्लिव्ह्ज बाह्यांचे लेटेस्ट पॅटर्न, दिसाल स्टायलिश- आकर्षक

नंतर त्याच कढईमध्ये तूप टाका. तूप गरम झालं की त्यात गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक टाका. हे मिश्रण चांगलं एकजीव होऊ द्या. या मिश्रणात कुठेही गुठळ्या होणार नाहीत, याची काळजी घ्या. 

हळूहळू मिश्रणाला थोडा फेस येईल. हा फेस जेव्हा कमी होईल आणि मिश्रण जेव्हा थोडं दाट झाल्यासारखं वाटेल तेव्हा त्यात तिळाचा कूट टाका.

 

आता पुन्हा सगळं मिश्रण एकजीव करून हलवून घ्या. गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्या. ही रेसिपी करताना गॅस नेहमी मध्यम किंवा मंद आचेवरच असावा. आता जेव्हा मिश्रण थोडं घट्ट होईल, तेव्हा गॅस बंद करा आणि ७ ते ८ मिनिटे ते मिश्रण तसेच थंड होऊ द्या.

झाडांवर रोग पडून पानांना छिद्र पडली? स्वयंपाकघरातला १ पदार्थ टाका- झाडं पुन्हा होतील सदाबहार

यानंतर मिश्रणामध्ये गूळ, वेलची पूड, सुंठ पावडर, जायफळ टाका आणि सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. जसा जसा गूळ मिश्रणात विरघळेल आणि मिश्रण थंड होईल तसं तसं मिश्रण आणखी घट्ट हाेईल.

आता एका ताटलीला किंवा डब्याला तूप लावून घ्या 

नंतर ते मिक्सरमध्ये टाकून त्याचा कूट करून घ्या आणि त्यात हे मिश्रण पसरवून टाका. २ ते ३ तासांनी मिश्रण थंड झालं की त्याच्या वड्या पाडा. अतिशय मऊ आणि चवदार अशी ही तिळाची बर्फी यंदा संक्रांतीला करून पाहा. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृतीमकर संक्रांती