मकर संक्रात (Makar Sankranti 2024) म्हटलं की सगळ्यात आधी आठवतं ते म्हणजे तिळ गूळ. तिळाचे लाडू (Til Gul Ladoo) सर्वांनाच खायला आवडतात कारण मेथीच्या लाडू प्रमाणे या लाडूची कडवट चव नसते ना जास्त गोड असतात. यात साखरेऐवजी गुळाचा वापर केला जातो त्यामुळे तब्येतीलाही पौष्टीक असतात. (Tilache Ladoo Kase Karayche) थंडीच्या दिवसांत तीळ खाल्ल्याने शरीरात उष्णता टिकून राहते. (Til ladoo without Gas Stove)
तिळाचे लाडू करायला अगदी सोपे असतात (Til Ke Laddu Sesame Laddu) पण रेसिपी चुकली किवा लाडू करताना छोट्या चुका केल्या तर लाडू फार कडक होतात. अशी अनेकांची तक्रार असते. (Til-gul Ladoo Recipe) तिळाचे लाडू कडक होऊ नयेत यासाठी एक सोपी ट्रिक ते म्हणजे गॅसचा वापर न करता लाडू करायचे. लाडू करण्याची ही सोपी पद्धत नेमकी कशी ते पाहूया. (Cooking Hacks & Tricks)
तिळाचे लाडू करण्यासाठी साहित्य (How to Make Til gul Ladoo)
१) भाजलेले पांढरे तीळ -१५० ग्रॅम
२) बारीक केलेला गूळ- एक वाटी
३) साजूक तूप- एक वाटी
गॅस पेटवता तिळाचे लाडू करण्याची सोपी पद्धत (How to Make Soft Til gul Ladoo)
१) तिळाचे लाडू करण्यासाठी तुम्ही पांढरे पॉलिश केलेले तीळ किंवा सालं निघालेले थोडे काळपट दिसणारे तीळही वापरू शकता. भाजलेले तीळ मिक्सरला लावून त्याची पावडर बनवून घ्या. जास्त बारीक करू नका अन्यथा तिळाला तेल सुटेल आणि लाडू चांगला होणार नाही. तुम्हाला तिळाची पावडर नको असले तर तुम्ही भाजलेले तीळही थेट वापरू शकता. त्यानंतर गुळाचा खडा बारीक चिरून गुळाचीही पावडर तयार करून घ्या.
२) एका भांड्यात तीळ, गुळाचे मिश्रण आणि साजूक तूप घालून एकजीव करून घ्या. यात चमचाभर फ्रेश क्रिम घाला. हाताने याचे मिश्रण एकजीव करून छोट्या आकाराचे लाडू वळून घ्या. तयार आहेत सुपरसॉफ्ट तिळाचे लाडू. एक घास खाल्ला तरी पुन्हा खातच राहावेसं वाटेल.
थंडीतही १५ मिनिटांत घरीच करा विकतसारखं घट्ट दही; ३ ट्रिक्स- गोड, कवडीदार दही तयार
घरातील वयस्कर लोकही हा लाडू अगदी सहज खाऊ शकतात. जिभेवर ठेवताच पाणी होईल असा लाडू सर्वांनाच खायला आवडेल, हे लाडू करण्याचा सगळ्यात मोठा फायदा असा की ते कडक होत नाहीत. पाकाचा वापर असल्यामुळे गॅसही पेटवावा लागत नाही. त्यामुळे पाक घट्ट झाला, पातळ झाला अशा समस्या येत नाहीत आणि लाडू चवदार, स्वादीष्ट बनतो.