Lokmat Sakhi >Food > Makar sankranti Til ladoo recipe : तिळाचे लाडू दात तुटून हातात येतील एवढे कडक होतात? ही पद्धत वापरा, लाडू खाताना सहज तुटतील

Makar sankranti Til ladoo recipe : तिळाचे लाडू दात तुटून हातात येतील एवढे कडक होतात? ही पद्धत वापरा, लाडू खाताना सहज तुटतील

Makar sankranti Til ladoo recipe :  गूळ निवडण्यापासून लाडू व्यवस्थित वळेपर्यंत अनेक बारीक सारीक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 04:45 PM2022-01-09T16:45:04+5:302022-01-09T16:51:37+5:30

Makar sankranti Til ladoo recipe :  गूळ निवडण्यापासून लाडू व्यवस्थित वळेपर्यंत अनेक बारीक सारीक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.

Makar sankranti Til ladoo recipe : Makar sankranti special easy til laddu recipe | Makar sankranti Til ladoo recipe : तिळाचे लाडू दात तुटून हातात येतील एवढे कडक होतात? ही पद्धत वापरा, लाडू खाताना सहज तुटतील

Makar sankranti Til ladoo recipe : तिळाचे लाडू दात तुटून हातात येतील एवढे कडक होतात? ही पद्धत वापरा, लाडू खाताना सहज तुटतील

मकरसंक्रांतीचा (Makar sankranti 2022) सण काही दिवसांवर येऊन ठेपलाय घरोघरच्या बायकांची तिळाचे लाडू, चिक्की बनवण्याची लगबग सुरू असेल. तिळाचे लाडू बनवायला खूप सोपे, झटपट असेल तरी सगळ्यांनाच छान बनवता येतात असं नाही.  अनेकजणींचे तिळाचे लाडू दातानं तुटता तुटत नाहीत. गूळ निवडण्यापासून लाडू व्यवस्थित वळेपर्यंत अनेक बारीक सारीक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. तुम्ही सुद्धा जर तिळाचे लाडू मनसोक्त खाण्याच्या विचारात असाल लाडू बनवण्याच्या काही ट्रिक्स माहीत करून घ्या. (Til Ladu Recipe)

तिळाच्या लाडूंची रेसेपी (Til Ladu Recipe)

साहित्य

१/२ किलो तिळ,

१/२ किलो चिकीचा गूळ,

१ ते दिड वाटी शेंगदाण्याचे कूट,

१ वाटी किसून भाजलेले सुकं खोबरं,

१/२ वाटी चण्याचं डाळं,

१ चमचा वेलची पूड,

१ ते २ चमचे तूप.

कृती

सगळ्यात आधी तिळ व्यवस्थित भाजून घ्यावेत. गॅसवर एक भांडे ठेवाव. त्या भांड्यात चिकीचा गूळ घ्यावा. थोडे तूप घालावे. गूळाचा गोळीबंद पाक करा,सतत ढवळत राहा.

गूळ पूर्ण पातळ झाला कि थोड्या वेळाने तो फेसाळतो. पाक गोळीबंद झाला आहे कि नाही हे पाहण्यासाठी गूळाचा पाक फेसाळला की गॅस बारीक करावा. एका वाटीत गार पाणी घ्यावे. त्यात एक थेंब पाक घालावा. 

बोटाने तो पाक हातात घेऊन त्याची गोळी करावी आणि वाटीतल्या पाण्यात तो गोळा खडा मारल्यासारखा टाकावा. जर वाटीचा "टण्णं" असा आवाज आला तर पाक तयार आहे असे समजावे. 

पाक गोळीबंद झाला कि त्यात भाजलेले तिळ, दाण्याचा कूट, भाजलेले सुके खोबरे, चण्याच्या डाळा, वेलची पूड घालून नीट ढवळा आणि गरम असतानाच लाडू वळा. लाडू वळताना हाताला थोडे तूप लावा ज्यामुळे गरम मिश्रण हाताला चिकटणार नाही. तयार आहेत गरमागरमा स्वादिष्ट तिळाचे लाडू

1)

2)

3)

Web Title: Makar sankranti Til ladoo recipe : Makar sankranti special easy til laddu recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.