Join us

तिळाच्या वड्या करताना लक्षात ठेवा ५ टिप्स, वड्या कडक - मऊ - चिकट न होता, परफेक्टच होतील...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2025 14:45 IST

Til Vadi Recipe : Tilgul Vadi Recipe : How To Make Tilachi Vadi At Home : Makarsankranti Special Tilachi Vadi Recie : १५ मिनिटांत तिळाच्या वड्या करण्याची सोपी रेसिपी, वड्या करताना टिप्स ठरतील उपयोगी...

मकरसंक्रांत जवळ आली की आपल्याला वेध लागतात ते तिळाचे लाडू आणि (Til Vadi Recipe) वड्यांचे. या वड्या किंवा लाडू खायला छान लागत असले तरी करायला ते वाटते तितके सोपे नाही. तीळ (Tilgul Vadi Recipe) आणि गूळ इतकेच पदार्थ वापरुन या खमंग वड्या (How To Make Tilachi Vadi At Home) करायच्या असल्या तरी पाकाचा अंदाज येणे हे त्यातील सगळ्यात कसब लागणारे काम. कधी हा पाक खूप घट्ट होतो तर कधी खूप पातळ(Makarsankranti Special Tilachi Vadi Recie).

त्यामुळे वड्या एकतर दाताने तुटणार नाहीत इतक्या कडक होतात नाहीतर त्याचे लाडू वळावे लागतील इतक्या चिकचिकीत होतात. असे होऊ नये म्हणून काही सोप्या टिप्स समजून घेणे गरजेचे आहे. पाहूयात एकसारख्या मस्त खुसखुशीत तिळाच्या वड्यांसाठी काय करायचे....

साहित्य :- 

१. तीळ - १ कप २. गूळ - १ कप ३. साजूक तूप - २ ते ३ टेबलस्पून ४. शेंगदाण्याचा कुट - १ कप (भाजून घेतलेल्या दाण्याचा कूट)५. वेलची पूड - १/२ टेबलस्पून 

तिळाचे लाडू वळताना हाताला चटके बसतात? २ ट्रिक्स, चटके न बसता वळा एका आकाराचे परफेक्ट लाडू...

मटार सोलण्याचं काम होईल झटपट, ३ ट्रिक्स- काही मिनिटांतच मटार होतील सोलून...

कृती :-

१. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये तीळ घेऊन ते मंद आचेवर हलकेच सोनेरी रंग येईपर्यंत कोरडेच भाजून घ्यावेत. २. तीळ २ ते ३ मिनिटे भाजून झाल्यानंतर ते एका डिशमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यावेत. ३. त्यानंतर त्याच पॅनमध्ये थोडे तूप घेऊन त्यात किसलेला गूळ घालावा. हा गूळ चमच्याने सतत हलवत त्याचा पातळसर पाक तयार करून घ्यावा. ४. ६ ते ७ मिनिटे चमच्याने सतत हलवत पाक तयार करून घ्यावा. ५. पाक तयार झाल्यावर यात भाजून घेतलेले तीळ, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि चवीनुसार वेलची पावडर घालावी. ६. मग गॅस बंद करून चमच्याने हलवत सगळे मिश्रण एकजीव करून घ्यावे. 

मुलांची छोटी भूक, खाऊच्या डब्यासाठी कुकरमध्ये करा इराणी स्टाईल स्पॉंजी मावा केक...

७. आता एका डिशला तूप लावून त्यावर हे तिळाच्या वडीचे तयार मिश्रण ओतून चमच्याने हलका दाब देत चपातीप्रमाणेच गोलाकार करत मध्यम जाडीचा थर तयार करून घ्यावा. ८. मग सगळ्यात शेवटी लाटण्याच्या मदतीने हलकेच वरून दाब देत तिळाची वडी लाटून घ्यावी. ९. हे मिश्रण थोडे गरम असेपर्यंतच सूरी किंवा पिझ्झा कटरने याचे काप किंवा तुकडे पाडून घ्यावेत. 

छान, खमंग, खुसखुशीत, क्रिस्पी अशा तिळाच्या वड्या खाण्यासाठी तयार आहेत. 

तिळाच्या वड्या करताना लक्षात ठेवा... 

१. वड्या जास्त मऊ किंवा चिकचिकीत होतात असे वाटले तर त्यामध्ये दाण्याचा कूट वाढवावा. त्यामुळे वड्या पडायला मदत होईल.

२. तूप कमी घातले तरीही वड्या खुसखुशीत न होता जास्त कडक होतात. त्यामुळे दोन चमचे तूप घालावेच. लागले तर अंदाज घेऊन आणखी थोडे घालावे. 

३. तिळाचे लाडू किंवा वड्यांसाठी बाजारात वेगळा गूळ मिळतो, तोच गूळ आणावा. गूळाचा दर्जा चांगला नसेल तरी वड्या कडक किंवा जास्त मऊ होऊ शकतात. 

४. वड्या चिवट झाल्या असे वाटल्यास त्याला वरच्या बाजूने पिठीसाखर भुरभुरावी. तसेच खोबऱ्याचा किस करुन तोही वरुन वड्यांवर टाकल्यास वड्यांना काही प्रमाणात घट्टपणा येण्यास मदत होते. 

५. गूळ जास्त वेळ गॅसवर गरम करत ठेवला तर वड्या जास्त क़डक होण्याची शक्यता असते. त्यामुळे गूळाचा पाक झाला की दोन मिनीटे तो एकसारखा हलवून गॅस बंद करायचे लक्षात ठेवायला हवे.

टॅग्स :अन्नपाककृतीमकर संक्रांतीहिवाळ्यातला आहार