Lokmat Sakhi >Food > झणझणीत काहीतरी मस्त खावंसं वाटतंय? करा दह्याच्या चटणीचे 3 प्रकार.. तोंडाला चवच येईल!

झणझणीत काहीतरी मस्त खावंसं वाटतंय? करा दह्याच्या चटणीचे 3 प्रकार.. तोंडाला चवच येईल!

जेवणात चटपटीत, झणझणीत हवं असल्यास करा तोंडाला चव आणणाऱ्या दह्याच्या चटणीचे 3 प्रकार.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2022 05:41 PM2022-04-26T17:41:22+5:302022-04-26T17:44:07+5:30

जेवणात चटपटीत, झणझणीत हवं असल्यास करा तोंडाला चव आणणाऱ्या दह्याच्या चटणीचे 3 प्रकार.. 

Make 3 types of curd chutney .. Taste will be revive | झणझणीत काहीतरी मस्त खावंसं वाटतंय? करा दह्याच्या चटणीचे 3 प्रकार.. तोंडाला चवच येईल!

झणझणीत काहीतरी मस्त खावंसं वाटतंय? करा दह्याच्या चटणीचे 3 प्रकार.. तोंडाला चवच येईल!

Highlightsलसूण, कांदा, शेंगदाण्याची दही घालून चटणी जेवणाला मस्त स्वाद आणते. या चटण्यांचं विशेष म्हणजे त्या कमी सामग्रीत झटपट होतात.

जेवणात दही असलं की मजा येते. पण नेहमी नुसतं दही खाऊनही कंटाळा येतो. नेहमीच्या चटण्या, कोशिंबीरी, रायते यापेक्षा काहीतरी वेगळं, चटपटीत  झणझणीत खावंसं वाटतं. अशा वेळेस दह्याच्या चटण्या करुन पाहायला हव्यात. लसूण, कांदा, शेंगदाण्याची दही घालून चटणी जेवणाला मस्त स्वाद आणते. या चटण्यांचं विशेष म्हणजे त्या कमी सामग्रीत झटपट होतात.

Image: Google

दही लसणाची चटणी

लसणामुळे पदार्थांना खमंग चव येते. दही लसूण चटणीही खमंग लागते. दही लसून चटणी हा प्रकार खास राजस्थानचा. ही चटणी तयार करण्यासाठी 10 सुक्या लाल मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, बारीक कापलेलं आलं, 2 चमचे धने, थोडे जिरे, अर्धा चमचा काळे मिरपूड, 1 चमचा मोहरी, गरजेनुसार तेल आणि चवीनुसार मीठ घ्यावं. 

दह्याची चटणी करण्यासाठी लाल मिरच्या अर्धा तास पाण्यात भिजत ठेवाव्यात. लसूण निवडून घ्यावा. पॅनमध्ये तेल गरम करावं. तेल गरम झालं की लसणाच्या पाकळ्या घालून लसूण परतून घ्यावा. लसून लालसर परतला गेला की त्यात थोडं बारीक चिरलेलं आलं घालावं. लसूण आणि आलं चांगलं परतून घ्यावं. नंतर यात भिजवलेल्या लाल मिरच्या घालाव्यात. मिरच्या परतल्या की धने, जिरे, काळे मिरीपूड घालावी. मसाल्यांचा सुंगध येईपर्यंत जिन्नस भाजून घ्यावं. गॅस बंद करुन ते गार होवू द्यावं. गार झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करावं. पुन्हा कढईत तेल गरम करावं.  तेल तापलं की त्यात मोहरी, जिरे, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, लसणाच्या 3 पाकळ्या घालाव्यात. नंतर वाटलेलं मिश्रण घालून तेल सुटेपर्यंत ते परतून घ्यावं. गॅस बंद केला की यात फेटलेलं दही घालून चटणी हलवून घ्यावी. ही चटणी पराठ्यांसोबत तसेच  साध्या वरण भातासोबतही छान लागते. 

Image: Google

दही कांदा चटणी

दही कांदा चटणी करण्यासाठी 1 कप दही, थोडी काळे मिरपूड, छोटा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा बारीक कापलेला लसूण, 2 बारीक कापलेले कांदे, थोडा बारीक चिरलेला पुदिना, 1 छोटा चमचा बारीक कापलेलं आलं आणि चवीनुसार मीठ घ्यावं. 
दही कांदा चटणी करण्यासाठी  एका वाटीत दही घेऊन ते फेटून घ्यावं. आलं, लसूण, कोथिंबीर, आणि पुदिना मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावं.  वाटलेलं मिश्रण फेटलेल्या दह्यात घालावं. ते चांगलं मिसळलं की त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा नीट दह्यात कालवला की त्यात मीठ, काळे मिरपूड, लाल तिखट घालून  चटणी चांगली हलवून घ्यावी. 

शेंगदाणा दही चटणी

नुसती शेंगदाण्याची चटणी आवडत नसल्यास शेंगदाणा दही चटणी करावी. ही चटणी करण्यासाठी अर्धा कप खमंग भाजलेले शेंगदाणे, अर्धा कप दही, 1-2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे , 1 मोठा चमचा साजूक तूप, 1-2 चमचे साखर, चवीनुसार सैंधव मीठ घ्यावं. 

शेंगदाणा दही चटणी करताना मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे, जिरे, साखर, मीठ आणि हिरवी मिरची घालून ते वाटून घ्यावं. नंतर यात दही घालून ते पुन्हा वाटून घ्यावंं. कढईत  तूप गरम करावं. तुपात जिरे घालून ते तडतडले की त्यात शेंगदाणा दह्याची पेस्ट घालाएए. या चटणीला उकळी आली की गॅस बंद करावा. 


 

Web Title: Make 3 types of curd chutney .. Taste will be revive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.