Join us

एकदाच करा ५ फ्लेवरची मलाई कुल्फी.. रंगीत-सॉफ्ट कुल्फी उन्हाळ्यात तर खायलाच हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2025 20:05 IST

Make 5 flavored Malai Kulfi at once.. Colorful-soft Kulfi is a must in summer : गारेगार कुल्फी तो बनती है. उन्हाळ्यासाठी खास रेसिपी.

उन्हाळ्यामध्ये छान गार पदार्थ करायला हवेतच. उन्हाचा त्रास इतका असह्य होतो की सतत गार खाण्याची इच्छा होते. (Make 5 flavored Malai Kulfi at once.. Colorful-soft Kulfi is a must in summer)मात्र तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. काही तरी वेगळी चव जिभेला हवी हवीशी वाटत असेल तर मग ही रेसिपी नक्की वाचा. एकाच वेळी पाच फ्लेवरच्या मस्त गोड, मऊ आणि गारेगार कुल्फी करता येतात. ते ही अगदी कमी वेळात आणि कमी कष्टात. कुल्फी तर तुम्ही खाल्लीच असेल, पण ही कुल्फी नक्कीच खाल्ली नसेल. (Make 5 flavored Malai Kulfi at once.. Colorful-soft Kulfi is a must in summer)ना मावा वापरायचा ना इतर कोणता पदार्थ फक्त घरात असलेल्या पदार्थांचा वापर करून मस्त कुल्फी करा. पाहा ही सोपी रेसिपी.

साहित्यदूध, साखर, मिल्क पावडर, वेलची पूड, कॉर्नफ्लावर, पिस्ता, आंबा, गुलकंद, बदाम, काजू, पेपर ग्लास

कृती१. एका पातेल्यामध्ये दूध गरम करत ठेवा. ते उकळल्यावर त्यामध्ये साखर घाला. तुम्हाला जेवढं गोड आवडत त्यानुसार साखर वापरा. एका वाटीमध्ये मिल्क पावडर घ्या. त्यामध्ये गरम केलेल्या दुधातील थोडे दूध घाला. पेस्ट करुन घ्या. मग ती उकळत्या दुधामध्ये मिक्स करा. नंतर एका वाटीमध्ये थोडे कॉर्नफ्लावर घ्या. त्यामध्ये थोडे दूध घाला. मिक्स करा. गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. मग ती पेस्ट दुधात घाला. दूध ढवळत राहा. ते आटेल आणि जरा घट्ट होईल मग थोडी वेलची पावडर घाला. आणि गॅस बंद करा.

२. दूध जरा कोमट झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे दूध घ्या. त्यामध्ये पिस्ता घाला आणि  वाटून घ्या. नंतर पुन्हा थोडे दूध घ्या, त्यामध्ये आंबा घाला आणि वाटून घ्या. असे सगळ्या फ्लेवरसाठी करून घ्या. गुलकंद, बदाम व काजूही असेच वाटून घ्या. ३. पाच पेपर ग्लास घ्या. प्रत्येक फ्लेवर वेगळ्या ग्लासमध्ये ओता. वरतून प्लास्टीकने झाकून रबर लावा. आणि पाचही ग्लास फ्रिजरमध्ये ठेवा. जवळपास ८ ते ९ तासांमध्ये कमाल मलाई कुल्फी तयार होईल. आस्वाद घेत खा.  

टॅग्स :अन्नसमर स्पेशलपाककृती