Lokmat Sakhi >Food > उपवासालाच कशाला एरवीही नाश्त्याला करा साबुदाण्याचा कुरकुरीत डोसा;झटपट होणारा चविष्ट पदार्थ 

उपवासालाच कशाला एरवीही नाश्त्याला करा साबुदाण्याचा कुरकुरीत डोसा;झटपट होणारा चविष्ट पदार्थ 

साबुदाण्याचा कुरकुरीत डोसा.. पोटभरीचा आणि भरपूर एनर्जी देणारा साबुदाण्याचा झटपट पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2022 07:53 PM2022-04-05T19:53:07+5:302022-04-06T12:20:49+5:30

साबुदाण्याचा कुरकुरीत डोसा.. पोटभरीचा आणि भरपूर एनर्जी देणारा साबुदाण्याचा झटपट पदार्थ

Make a Crispy dosa of sago for breakfast.. simple recipe of tasty dosa | उपवासालाच कशाला एरवीही नाश्त्याला करा साबुदाण्याचा कुरकुरीत डोसा;झटपट होणारा चविष्ट पदार्थ 

उपवासालाच कशाला एरवीही नाश्त्याला करा साबुदाण्याचा कुरकुरीत डोसा;झटपट होणारा चविष्ट पदार्थ 

Highlightsसाबुदाण्याच्या डोशासाठी साबुदाणे 4 तास भिजवावे.कुरकुरीत डोसा होण्यासाठी साबुदाण्याच्या डोशाचं मिश्रण खूप घट्ट असू नये. नारळाच्या ओल्या चटणीसोबत साबुदाण्याचा डोसा उत्तम लागतो.

साबुदाण्याचे पदार्थ केवळ उपवासालाच नाही तर एरवीही नाश्त्याला चवबदल म्हणून करता येतात. साबुदाण्याचा डोसा हा त्यातलाच प्रकार. साबुदाणा, भगर, दही आणि मीठ यांचा वापर करुन साबुदाण्याचा चविष्ट डोसा झटपट करता येतो. साबुदाण्याचा डोसा खाऊन पोट भरतं. डोसा खाल्ल्यानं शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. नारळाच्या ओल्या चटणीसोबत साबुदाण्याचा डोसा उत्तम लागतो. 

Image: Google

कसा करावा साबुदाणा डोसा?

साबुदाण्याचा डोसा करण्यासाठी 1 कप साबुदाणा, अर्धा कप भगर, 2 मोठे चमचे दही , चवीनुसार मीठ आणि थोडं तेल घ्यावं. 
साबुदाणा धुवून 4 तास भिजत घालावा. भगर अर्धा तास भिजवून घ्यावी. मिक्सर किंवा ब्लेण्डरमधून साबुदाणा, भगर, दही आणि थोडं पाणी घालून मिश्रण बारीक वाटावं. वाटलेलं मिश्रण एका भांड्यात काढून त्यात मिश्रण पातळ करण्यासाठी थोडं पाणी घालावं. डोशाचं मिश्रण जास्त घट्ट असू नये. मिश्रणात चवीपुरतं मीठ घालून मिश्रण चांगलं फेटून घ्यावं. 

Image: Google

डोसे घालण्यासाठी नाॅनस्टिक तवा मध्यम आचेवर गरम करावा. त्यावर 2-3 थेंब तेल घालून ते पसरवून घ्यावं. तव्यावर 2 चमचे पाणी घालून सूती कपड्यानं तवा हळूवार पुसून घ्यावा. नंतर तव्यावर डोशाचं 2 चमचे मिश्रण घालावं. ते चमच्यानं गोल पसरवून घ्यावं. दोन्ही बाजूंनी डोसा सोनेरी रंगावर शेकून घेतला की साबुदाण्याचा कुरकरीत डोसा तयार होतो. 

Web Title: Make a Crispy dosa of sago for breakfast.. simple recipe of tasty dosa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.