भजी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या दिसतात. आपण नेहमीची कांदा भजी, बटाट्याची भजी, मूग डाळीची भजी अतिशय आवडीने खातो. गरमा गरम, कुरकुरीत, खमंग भजी पाहिली किंवा त्यांचा सुगंध जरी आला तरी आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. गरमागरम भजी आणि वाफाळलेला चहा यासारखं स्वर्गसुख दुसरे काही नाही. काहीवेळा आपल्याला रोजचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो अशावेळी आपल्याला काहीतरी वेगळं चटपटीत खाण्याचा मोह होतो. अशा परिस्थितीत आपण भजी सारखा सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ घरी देखील बनवून खातो. चटपटीत खाण्याची इच्छा झाली तर आपण कधीही भजी खाण्याचा पर्याय निवडतो.
भजी खाण्यासाठी जितकी आवडते तितकीच ती तळून काढल्यामुळे तेलकट देखील होते. चमचमीत, चटपटीत पदार्थ म्हटले की त्यात थोडे तेल असणारच. परंतु हे असले चमचमीत पदार्थ कमी तेलात बनून तयार झाले तर आपल्याला हवे तेवढे मनसोक्त खाता येतील. आपण सहसा संध्याकाच्या नाश्त्याला चहासोबत खायला म्हणून कांदाभजी बनवतो. या रोजच्या कांदाभजीला थोडा वेगळा टच देत कमी तेलात देखील आपण तितक्याच खमंग, खुसखुशीत कांदा भजी बनवू शकतो(Healthy & Tasty Crispy Veg Tawa Bhaji Recipe : Less Oily Bhaji Recipe).
साहित्य :-
१. कांद्याची पात - १ कप (बारीक चिरुन घेतलेली)
२. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)
३. कोथिंबीर - १ कप (बारीक चिरलेली)
४. बेसन - १/३ कप
५. तांदुळाचे पीठ - ३ टेबलस्पून
६. बेकिंग पावडर - १/२ टेबलस्पून
७. कॉर्नफ्लॉवर - १ टेबलस्पून
८. मीठ - चवीनुसार
९. हळद - १/२ टेबलस्पून
१०. जिरे पूड - १ टेबलस्पून
११. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
१२. पांढरे तीळ - १.५ टेबलस्पून
१३. ओवा - १/२ टेबलस्पून
१४. लसूण पाकळ्या - ३ ते ४ (बारीक किसून घेतलेल्या)
१५. तेल - ५ ते ६ टेबलस्पून
१६. पाणी - १/४ कप
दिवसभर मुलांचा दंगा, काहीतरी खायला दे अशी भूणभूण? करा चीज पराठा, सुटीचा स्पेशल बेत...
उन्हाळ्यांत दही वारंवार आंबट होते ? दही लावायची सोपी पद्धत, दही होईल गोडसर...
कृती :-
१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये, कांद्याची पात, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, बेसन, तांदुळाचे पीठ, कॉर्नफ्लॉवर, बेकिंग पावडर घालून घ्यावी.
२. त्यानंतर या मिश्रणात चवीनुसार मीठ, हळद, जिरे पूड, लाल तिखट मसाला, पांढरे तीळ, ओवा, किसून घेतलेल्या लसूण पाकळ्या व पाणी घालून थोडे घट्टसर पीठ भिजवून घ्यावे.
अस्सल झणझणीत झुणका नाही खाल्ला तर काय मजा, गावरान झुणक्याची रेसिपी...
ना डाळ-तांदूळ भिजवण्याची गरज, ना आंबवण्याची; १० मिनिटांत करा गव्हाच्या पिठाचे डोसे...
३. आता एक पॅन घेऊन त्याला थोडेसे तेल लावून घ्यावे, तेल लावल्यानंतर हे भजीचे तयार बॅटर चमच्याने गोलाकार आकारात डोश्यासारखे पसरवून घ्यावे.
४. त्यानंतर या भाज्या तेलावर दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्याव्यात.
गरमागरम क्रिस्पी तवा भजीया खाण्यासाठी सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह कराव्यात.