वर्षे बदलतात, वय वाढते मात्र घरच्या कामांची घाई गडबड काही कमी होत नाही. कितीही टाईम मॅनेजमेंट केले तरी ऐनवेळी काही ना काही गडबड होतेच. (Make a delicious treat out of spoiled milk, see how grandma used to make it in just 10 minutes!)कधी आपण काही वस्तू आणायला विसरून जातो, तर कधी कुकर लावायला उशीर होतो. इतर कामांच्या नादात कधीतरी दूध फ्रिजमध्ये ठेवायला विसरतो. तसेच तापवायचेही राहून जाते. वेळीच तापले नाही की दूध नासते. दूध नासणे हा प्रकार घरी अनेकदा घडतो. मग आपण त्याचे पनीर तयार करतो. (Make a delicious treat out of spoiled milk, see how grandma used to make it in just 10 minutes!)लिटरभर दूध नासले तर अगदी मुठभरच पनीर तयार होते. दूध नासल्यावर पूर्वीच्या महिला पनीर तयार करत नसत. तर त्या त्यापासून काही गोड पदार्थ तयार करायच्या. हे पदार्थ तयार करणे फारच कष्टायचे काम आहे. म्हणून आजकाल ते तयार केले जात नसावेत. मात्र एक असा पदार्थ आहे जो अत्यंत सोपा आणि झटपट तयार होतो. चवीला अगदी खरवसासारखा लागतो.
आता परत कधी दूध नासले तर दुधाची नासकवणी तयार करा. चवीला मस्त लागते. दूध ही वाया जात नाही आणि थोड्या दुधात बरीच तयार करता येते. घरातील सगळ्यांना पुरेल आणि आवडेलही. नासकवणीला पातळ खरवस असे ही म्हटले जाते. इतरही विविध नावांनी हा पदार्थ ओळखला जातो.
साहित्य:
वेलची पूड, गूळ, नासलेले दूध
कृती:
१. दूध तापवत ठेवा. मंद आचेवरच तापवायचे. गॅस मोठा ठेवला तर दूध नासलेले असल्यामुळे त्यामध्ये उकळी येऊन ते भांड्या बाहेर उडते आणि करपट लागते.
२. दुधाला रवाळपणा येईपर्यंत ते उकळायचे. पाणी जरा वेगळे झाले की त्यामध्ये गूळ घालायचा. तुम्हाला गोड कितपत आवडते त्यानुसार गूळ वापरा. गूळ घातला की तो विरघळेपर्यंत सतत ढवळत राहा. दुधाचा रंग थोडा पिवळा होईल. त्यामध्ये वेलची पूड घाला.
३. १० मिनिटांनी पाणी आणि दूध वेगळे होईल मग गॅस बंद करायचा. त्यावर तुम्हाला आवडत असेल तर सुकामेवाही घालू शकता.