हिवाळयात बाजारांमध्ये पालेभाज्या अगदी फ्रेश, हिरव्यागार आणि ताज्या मिळतात. अशा ताज्या भाज्या बघून आपण लगेच त्या ख्ररेदी करतो. इतर वर्षभरात जितक्या चांगल्या भाज्या येत नाहीत तितक्या या हिवाळ्याच्या ऋतूंत येतात. याचबरोबर हिवाळा हा ऋतू असा आहे की, एकाचवेळी एकदम भाज्या, फळं, पालेभाज्या खरेदी करून आणल्या तरी त्या वातावरणातील गारव्याने जास्त दिवस फ्रेश आणि ताज्या राहतात(Methi Na Gota Recipe).
पालेभाज्या लगेच खराब न होता भरपूर दिवस (Methi ke Pakode) टिकतात. यामुळेच शक्यतो हिवाळ्यात पालेभाज्या जास्त प्रमाणांत खाल्या जातात. हिवाळ्यात आपण हिरवीगार मेथीच्या पानांची जुडी तर आवर्जून आणतोच. या हिरव्यागार कोवळ्या पानांपासून आपण मेथीचे थेपले, भाजी, मेथीची वडी असे अनेक चविष्ट पदार्थ तयार करून खातोच. यासोबतच हिवाळ्यात थंडीपासून स्वतःचे संरक्षण व आरोग्य चांगले ठेवण्यासाठी रोजच्या आहारात मेथी (Methi Bhajiya Recipe) खाणे आवश्यक असते. यंदाच्या हिवाळ्यात गुजराथी स्पेशल 'मेथी ना गोटा' हा भजी सारखा पारंपरिक पदार्थ नक्की ट्राय करुन पाहा. 'मेथी ना गोटा' करण्याची सोपी पारंपरिक रेसिपी पहा(How To Make Methi Bhajiya At Home In Winter).
साहित्य :-
१. धणे - १ टेबलस्पून
२. काळीमिरी - १ टेबलस्पून
३. ओवा - १/२ टेबलस्पून
४. बेसन - १ कप
५. रवा - १ टेबलस्पून
६. हिरव्या मिरच्या - ४ ते ६ (बारीक चिरलेल्या)
७. हिंग - चिमूटभर
८. साखर - १ टेबलस्पून
९. पाणी - गरजेनुसार
१०. मेथीची पानं - १ कप
१२. कोथिंबीर - १/२ कप
१३. मीठ - चवीनुसार
१४. सोडा - चिमूटभर
१५. लिंबाचा रस - १ टेबलस्पून
१६. गरम तेल - २ टेबलस्पून
हिवाळ्यात इडलीचे पीठ आंबत नाही? ३ टिप्स, सोडा न घालताही पीठ फुलेल भरभर, इडल्या होतील हलक्या...
खवलेलं नारळ फ्रिजमध्ये ठेवलं तरी सुकतंच? ‘हा’ पदार्थ कालवून ठेवा, खवट न होता टिकेल खूप दिवस...
कृती :-
१. सर्वात आधी मेथीची पानं स्वच्छ धुवून ती बारीक चिरुन घ्यावीत. याचबरोबर कोथिंबीर देखील बारीक चिरून घ्यावी.
२. खलबत्त्यात धणे, काळीमिरी, ओवा घेऊन ते हलकेच कुटून त्याची जाडसर भरड करुन घ्यावी.
३. आता एका बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यात रवा, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, हिंग, खलबत्त्यात कुटून घेतलेला जाडसर मसाला, साखर आणि गरजेनुसार पाणी घालून बेसनाचे बॅटर तयार करून घ्यावे.
हिंदी सिनेमात गाजलेले ‘मुली के पराठे’ हिवाळ्यात तर खायलाच हवे, पाहा सोपी आणि पौष्टिक रेसिपी...
४. बेसनाच्या तयार बॅटरमध्ये चिरुन घेतलेली मेथी आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ, सोडा, लिंबाचा रस घालूंन सगळे जिन्नस एकत्रित हलवून मिक्स करून घ्यावेत.
५. तयार बॅटरमध्ये बेसन पिठाच्या गुठळ्या राहिल्या असतील तर त्या मोडून घ्याव्यात. सगळ्यात शेवटी या बॅटरमध्ये थोडे गरम तेल घालून सगळे मिश्रण चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावे.
६. आता एका कढईत तेल गरम करत ठेवावे या गरम तेलात या बॅटरचे छोटे छोटे गोलाकार गोळे सोडून ते खरपूस रंग येईपर्यंत खमंग तळून घ्यावेत.
कडाक्याच्या थंडीत मस्त गरमागरम गुजराथी स्पेशल 'मेथी ना गोटा' खाण्यासाठी तयार आहे. सॉस किंवा चटणीसोबत ते खायला अजूनच टेस्टी लागतात.