आता संध्याकाळीही चहऐवजी एखादं गार पेय प्यायला सुरवात झालीच असेल. यंदा उन्हाळा परिसीमा गाठणार असे चिन्ह सध्या तरी दिसत आहे. (Make a summer special rose syrup at home)हवामान खात्याने सांगितल्यानुसार, यंदा दर वर्षीपेक्षा जास्त ऊन पडणार आहे. मग आपल्याला घरामध्ये लिंबाचे सरबत तर तयार ठेवायलाच हवे. त्याच बरोबर आवळा सरबतही हवे. तसेच कोकम सरबताला विसरून चालणार नाही. (Make a summer special rose syrup at home)पित्ताचा त्रास ज्यांना होतो, त्यांच्यासाठी कोकम म्हणजे औषधच. उन्हाळ्यामध्ये बडीशेपेचे सरबतही प्यायला हवे. ही सगळी सरबतं आपण घरी तयार करतो. अगदी अर्कापासून सगळं घरी करतो. मात्र एक सरबत आहे ज्याचा अर्क विकत आणतो. ते सरबत म्हणजे गुलाबाचे. गुलाबाचे फुल जेवढे सुंदर दिसते त्याहून जास्त मस्त या सरबताची चव असते.
लहान मुलांना तर ते फारच आवडते. त्यांना गुलाबाचा अर्क दुधात घालून दिला की ते अगदी आवडीने पितात. पण तुम्हाला माहिती आहे का? की विकतचा गुलाब अर्क नैसर्गिक पद्धतीने आटवलेला नसतो. तसेच त्यामध्ये गुलाब कमी आणि साखरच जास्त असते. त्यामुळे असे अर्क वर्षानुवर्षे टिकतात. गुलाबाचे सरबत घरी तयार करणे फारच सोपे आहे. फारच कमी कष्टात तयार होते.
साहित्यगुलाब, पाणी, साखर, लिंबू, मीठ, खाण्याचा लाल रंग
कृती१. चांगली ताजी गुलाबाची फुले घ्या. फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करून घ्या. त्या साध्या पाण्यामध्ये टाका आणि स्वच्छ धुऊन घ्या. नंतर एका पातेल्यामध्ये पाणी घ्या. त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाका. पाणी छान उकळू द्या. गुलाब हळूहळू रंग सोडेल. गुलाबाचा रंग बदलल्यावर गॅस बंद करा. त्यामधील पाकळ्या पांढर्या होतील. मग त्या वेगळ्या काढा आणि पाणी गार होऊ द्या.
२. दुसर्या पातेल्यामध्ये साखरेचा पाक तयार करा. पातेल्यामध्ये पाणी ओता त्यामध्ये साखर घाला. एक तारी पाक तयार करून घ्या. मग त्यामध्ये एक लिंबू पिळा. लाल रंग घाला. जर तुम्हाला रंग वापरायचा नसेल तरी काही हरकत नाही.
३. पाक छान तयार झाला की त्यामध्ये गुलाबाचे तयार केलेले पाणी घाला. आणि मग ते मिश्रण सतत ढवळत राहा. ते जरा घट्ट होईल. मग गॅस बंद करा. आणि सरबत गार झाल्यावर एका हवा बंद बाटलीत साठवून ठेवा.