Join us  

फक्त 10 मिनिटात करा अफगाणी पनीर, हॉटेलसारखी व्हाइट ग्रेव्ही घरच्याघरी, पनीर स्पेशल डिश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2022 10:05 AM

पनीरचा स्पेशल चवीचा पदार्थ खाण्यासाठी हाॅटेलमध्येच जायला हवं असं नाही. घरच्याघरी व्हाइट ग्रेव्हीचं अफगाणी पनीर (how to make white gravy afghani paneer) तयार करुन आपण आपली आणि घरातल्यांची टेस्टी पनीर खाण्याची इच्छा पूर्ण करु शकतो.

ठळक मुद्देअफगाणी पनीर करताना पनीरचे तुकडे दोनदा दोन पध्दतीनं मॅरिनेट करावे लागतात. दही आणि क्रीमच्या मिश्रणात मॅरिनेट केलेले पनीरचे तुकडे नंतर ग्रील पॅनवर ग्रील करुन घ्यावेत. 

पनीरच्या पदार्थांचं नाव काढलं की तोंडाला पाणी सुटतं. पण पनीरचे पदार्थ खायचे म्हणजे हाॅटेल रेस्टाॅरण्टमध्येच जावं लागत कारण  तशा चवीचं घरी कुठे बनवता येतं. पण शेफ कुणाल कपूर (chef kunal kapoor) यांनी रेस्टाॅरण्ट स्टाइल पनीर भाजी घरी करण्याची रेसिपी सांगणारा व्हिडीओ शेअर करुन अनेकांची अडचण दूर केली आहे. अवघ्या 10 -15 मिनिटात व्हाइट ग्रेव्हीचं अफगाणी पनीर (afghani paneer)  घरच्याघरी कसं करायचं हे त्यांनी या व्हिडीओमधून शिकवलं आहे. आता पनीरचा स्पेशल चवीचा पदार्थ खाण्यासाठी हाॅटेलमध्येच जायला हवं असं नाही. घरच्याघरी व्हाइट ग्रेव्हीचं अफगाणी पनीर (how to make white gravy afghani paneer)  तयार करुन आपण आपली आणि घरातल्यांची टेस्टी पनीर खाण्याची इच्छा पूर्ण करु शकतो. 

Image: Google

अफगाणी पनीर कसं करणार?

व्हाइट ग्रेव्हीचं अफगाणी पनीर करण्यासाठी 300 ग्रॅम पनीर, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे आलं लसणाची पेस्ट, 1 मोठा चमचा लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना, 2-3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 8-10 भिजवलेले काजू, 1 कांदा, 2 चीज स्लाइस, 1 कप दही, पाऊण कप क्रीम, 1 छोटा चमचा काळी मिरे पूड, अर्धा चमचा कसूरी मेथी, 1 चमचा चाट मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा जिरेपूड, पाव कप पाणी, 1 मोठा चमचा तेल, 1 मोठा चमचा बटर, 2 तमाल पत्रं, 1 मोठी वेलची, 5 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा, 1 हिरवी मिरची, 1 छोटा चमचा आलं घ्यावं. 

Image: Google

अफगाणी पनीर करताना आधी पनीरचे बारीक तुकडे करावेत. पनीरच्या तुकड्यांना मीठ, लिंबाचा रस, आलं लसणाची पेस्ट लावून मॅरिनेट करावं. मिक्सरमधून कोथिंबीर, पुदिना, कांदा, हिरवी मिरची, काजू, चीज, आलं लसणाची पेस्ट  आणि थोडं पाणी टाकून त्याची बारीक आणि दाटसर पेस्ट करावी.  एका भांड्यात दही फेटून घ्यावं. त्यात क्रीम घालावं. या मिश्रणात मीठ, काळे मिरपूड, कसूरी मेथी, चाट मसाला, गरम मसाला आणि जिरे पावडर घालावी. हे सर्व नीट मिसळून घ्यावं. या मिश्रणात पनीरचे तुकडे मॅरिनेट करावेत.  नंतर  ग्रील पॅनमध्ये तेल टाकून  मॅरीनेट केलेले पनीरचे तुकडे ग्रील करुन घ्यावेत. मॅरिनेटचं मिश्रण बाजूला ठेवावं. ते करीसाठी लागतं. 

कढईत तेल आणि बटर एकत्र गरम करावं. ते गरम झाल्यावर त्यात तमाल पत्रं, वेलची, लवंग, दालचिनी आणि बारीक चिरलेलं आलं घालावं. नंतर मॅरिनेटचं मिश्रण घालावं. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावं. मिश्रणाला उकळी येवू द्यावी. नंतर ग्रील केलेले पनीरचे तुकडे करीमध्ये घालावे. वरुन कोथिंबीर घालावी. हे अफगाणी पनीर पोळी किंवा भातासोबत खावं.

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती