Join us  

न वाफवता करा दुधी भोपळ्याची वडी, नावडता भोपळाही होईल आवडता, पौष्टिक पोटभर खाऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2023 11:05 AM

Make Bottle Gourd Special Vadi, Delicious Recipe for All दुधी भोपळ्याची भाजी खाऊन कंटाळा आलाय? न वाफवता करा दुधी भोपळ्याची वडी

मॉन्सूनचं आगमन होताच खवय्यांची चंगळ सुरु होते. भजी, भाजलेला मक्का, यासोबत वडी देखील आवडीने खाल्ली जाते. वडी करण्याच्या अनेक पद्धती आहेत. वडीमध्ये देखील अनेक प्रकार आहेत. त्यात कोथिंबीर वडी, मेथी वडी, पालक वडी फार फेमस आहे. पण आपण कधी दुधी भोपळ्याची वडी करून पाहिली आहे का?

दुधी भोपळ्याची भाजी आपण हमखास खाल्ली असेल. काहींना ही भाजी आवडते, तर काही लोकं ही भाजी नाकं मुरडत खातात. जर घरातील सदस्यांना भाजी आवडत नसेल तर, त्यांना वडी तयार करून द्या. आता वडी म्हटलं की तिच मोठी प्रोसेस. भाजी चिरा, मिश्रण तयार करा, वाफवून घ्या, मग शेवटी तळा. आपण वाफवून न घेता दुधी भोपळ्याची वडी तयार करू शकता. ते कसे पाहूयात(Make Bottle Gourd Special Vadi, Delicious Recipe for All).

दुधी भोपळ्याची वडी करण्यासाठी लागणारं साहित्य

दुधी भोपळा

बेसन

हळद

लाल तिखट

स्वातंत्र्य दिन विशेष : १ कपभर मैद्याची करा कुरकुरीत जिलेबी! स्वातंत्र्यदिनी जिलेबीचा बेत तर हवाच..

मीठ

पाणी

हिरवी मिरची

लसूण

आलं

तेल

मोहरी

हिंग

शेंगदाण्याचं कूट

कृती

सर्वप्रथम, एका मोठ्या भांड्यात २ कप बेसन, अर्धा चमचा हळद, एक टेबलस्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून बॅटर तयार करा. आपण या ठिकाणी २ कप बेसन घेतलं आहे, तर त्याप्रमाणे ४  कप पाणी घेणार आहोत.

दुसरीकडे खलबतं घ्या, त्यात ४ हिरव्या मिरच्या, आलं, ५ ते ६ लसणाच्या पाकळ्या घेऊन पेस्ट तयार करा. व ही तयार पेस्ट एका वाटीमध्ये काढून ठेवा. आता एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा घ्या. त्याची सालं काढून घ्या. व दुधी भोपळा किसणीने बारीक किसून घ्या.

बटाट्याचे नको तर करुन पाहा रव्याचे फ्रेंच फ्राईज, १ वाटी रव्याचा चटकदार पदार्थ

गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ टेबलस्पून तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक टेबलस्पून मोहरी, चिमुटभर हिंग, आलं - लसूण - हिरवी मिरचीची तयार पेस्ट, व किसलेला दुधी भोपळा घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात बेसनाचं तयार बॅटर आणि २ चमचे शेंगदाण्याचं कूट घालून मिक्स करा.

दुसरीकडे एका मोठ्या प्लेटला तेल लावून ग्रीस करा. त्यात हे तयार बॅटर घालून चमच्याने सेट करा. बॅटर थंड झाल्यानंतर त्याची चौकोनी आकाराची वडी कापून घ्या. वडी कापून झाल्यानंतर कढईत तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात वडी सोडून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. अशा प्रकारे न वाफवता दुधी भोपळ्याची वडी खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स