Join us  

इडलीच्या पिठाचे करा खमंग-खुसखुशीत बटाटेवडे फक्त १० मिनिटांत! पाहा साधीसोपी भन्नाट रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2024 12:38 PM

Make Crispy Batata Vada From Leftover Idli Batter : how to make batata vada from leftover idli batter उरलेलं इडलीचं पीठ दिवसेंदिवस फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवण्यापेक्षा करा झटपट होणारे बटाटे वडे...

दाक्षिणात्य पदार्थांपैकी 'इडली' हा आपल्या सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे. इडली दिसायला पांढऱ्या शुभ्र रंगाची खाण्यासाठी मऊ आणि पचण्यासाठी हलकी असते. इडली हा एक असा पदार्थ आहे जो आपण सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळी किंवा रात्री देखील खाऊ शकता. आपल्याकडे बहुदा सकाळच्या नाश्त्याला इडली आवडीने बनवून खाल्ली जाते. काहीवेळा आपण इडली, डोसा अशा पदार्थांचे बॅटर तयार करतो, परंतु काहीवेळा हे बॅटर (Use Of Leftover Idli Batter) जास्त प्रमाणात उरते. हे उरलेले बॅटर आपण फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवतो(how to make batata vada from leftover idli batter).

फ्रिजमध्ये स्टोअर केलेलं बॅटर वापरून आपण अनेकवेळा त्याची इडली तयार करून खातो. अशा फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवलेल्या बॅटरचा वापर करून नेहमीच्या इडल्या तयार करण्यापेक्षा आपण झटपट तयार होणारे बटाटे वडे तयार करु शकतो. यासाठीच जर जास्तीचे इडली बॅटर उरलेले असेल तर प्रत्येकवेळी त्याच्या इडल्याच न करता किंवा ते फेकून न देता बटाटे वडे (Leftover Idli Batter Vada) तयार करू शकतो. इडली बॅटरचा वापर करुन झटपट तयार होणारे खमंग, खुसखुशीत बटाटे वडे कसे तयार करावेत याची सोपी रेसिपी पाहुयात(Make Crispy Batata Vada From Leftover Idli Batter).   

साहित्य :-

१. उरलेले इडली बॅटर - ३ ते ४ कप २. उकडलेला बटाटा - २ कप ३. मोहरी - १ टेबलस्पून ४. चणा डाळ - १ टेबलस्पून ५. जिरे - १/२ टेबसलस्पून६. पांढरी उडीद डाळ - १/२ टेबसलस्पून ७. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)८. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ (बारीक चिरलेल्या)९. आलं - लसूण पेस्ट - १ टेबलस्पून १०. कडीपत्ता - ७ ते ८ पाने ११. हळद - १/२ टेबसलस्पून १२. सांबार मसाला - १ टेबलस्पून १३. बेसन पीठ - १ टेबलस्पून १४. मीठ - चवीनुसार १५. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)१६. तेल - तळण्यासाठी

चहात आलं घालताना ते किसून घालावं की कुटून ? "ही ' पद्धत उत्तम, चहा होईल फक्कड...

मसाला चहा तर नेहमीचाच ! कधी पहाडी मसाला चहा प्यायलाका ? एकदा पिऊन बघा  'असा' फक्कड चहा... 

कृती :- 

१. सगळ्यात आधी बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी एका मोठ्या कढईत तेल घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. २. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, मोहरी, पांढरी उडीद डाळ, चणा डाळ, हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, आलं - लसूण पेस्ट, कडीपत्ता, हळद, सांबार मसाला, बेसन पीठ, चवीनुसार मीठ व उकडलेला बटाटा घालून आपण नेहमी बटाट्याची भाजी करतो तशी भाजी तयार करून घ्यावी. ३. बटाटयाची ही भाजी तयार झाल्यानंतर भाजी थोडी थंड होण्यासाठी एका मोठ्या डिशमध्ये काढून ठेवावी.४. भाजी थंड झाल्यानंतर या भाजीचे छोटे छोटे गोलाकार गोळे तयार करून घ्यावेत. 

५. आता एका मोठ्या बाऊलमध्ये इडली बॅटर घेऊन ते व्यवस्थित ढळवळून घ्यावे. ६. त्यानंतर या भाजीचे छोटे तयार करून घेतलेले गोळे या इडली बॅटरमध्ये घालून संपूर्णपणे घोळवून घ्यावे. ७. कढईत तेल घेऊन हे इडली बॅटरमध्ये घोळवून घेतलेले वडे कढईत सोडून खरपूस गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यावेत. 

उरलेले इडली बॅटर वापरुन आपण त्यापासून असा झटपट तयार होणारा गरमागरम बटाटा वडा तयार करु शकतो.

टॅग्स :अन्नपाककृती