साधारण नाश्त्यामध्ये आपल्याला पोहे, उपमा, इडली आणि डोसा हे पदार्थ खायला मिळतात. मात्र, कधी कधी हेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. हिवाळ्यात काहीतरी गरमागरम आणि कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. आपण पोहेपासून कटलेट बनवू शकता. सोपी झटपट आणि चवीलाही उत्तम ही रेसिपी घरातील सदस्यांना नक्की आवडेल. सायंकाळची छोटी भूक भागवण्यासाठी आपण ही रेसिपी ट्राय करू शकता. चला तर मग या पदार्थाची कृती जाणून घेऊयात.
पोहा कटलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य
पोहे
टोमॅटो
लाल तिखट
चाट मसाला
मीठ
बटाटा
कांदा
तांदळाचं पीठ
कोथिंबीर
तेल
कृती
पोहा कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम पोहे धुवून भिजवून घ्या. पोहे चांगले भिजल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात उकडून घेतलेला बटाटा, बारीक चिरलेला टोमॅटो, लाल तिखट, चाट मसाला, मीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, टाकून चांगले मिक्स करा. आणि त्याचे कटलेट तयार करून घ्या. कटलेट तयार झाल्यानंतर तांदळाच्या पिठात बुडवून घ्या.
दुसरीकडे गॅसवर कढई ठेवा. त्यात तेल टाका. तेल गरम झाल्यानंतर त्यात कटलेट गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्या. अशाप्रकारे पोहा कटलेट खाण्यासाठी रेडी. आपण हे कटलेट हिरवी चटणी अथवा सॉससह खाऊ शकता.