Lokmat Sakhi >Food > फक्त १ कांदा कापून करा खमंग, क्रिस्पी कांदा वडे; सोपी रेसिपी, नाश्त्यासाठी खायला झटपट पदार्थ

फक्त १ कांदा कापून करा खमंग, क्रिस्पी कांदा वडे; सोपी रेसिपी, नाश्त्यासाठी खायला झटपट पदार्थ

Make Crispy Onion Vada using 2 onions : कांदा संसर्ग रोखण्यासाठी उपयुक्त मानला जातो. कांद्यामध्ये अँटी-अॅलर्जिक, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारच्या संक्रमणांपासून वाचवता येते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 02:25 PM2023-03-26T14:25:58+5:302023-03-26T16:00:04+5:30

Make Crispy Onion Vada using 2 onions : कांदा संसर्ग रोखण्यासाठी उपयुक्त मानला जातो. कांद्यामध्ये अँटी-अॅलर्जिक, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारच्या संक्रमणांपासून वाचवता येते.

Make Crispy Onion Vada using 2 onions; Easy recipe, sparkling option to eat with meals | फक्त १ कांदा कापून करा खमंग, क्रिस्पी कांदा वडे; सोपी रेसिपी, नाश्त्यासाठी खायला झटपट पदार्थ

फक्त १ कांदा कापून करा खमंग, क्रिस्पी कांदा वडे; सोपी रेसिपी, नाश्त्यासाठी खायला झटपट पदार्थ

कांदा आपल्या प्रत्येकाच्याच स्वयंपाकघरात असतो. जेवताना तोंडी लावणीसाठी कांदा असेल तर स्वंयपाकाची चव दुप्पटीनं वाढते आणि जेवणही व्यवस्थित जातं. (Onion Vada) कांदा भजी तर आपण खातोच, कांद्याचा वापर करून तुम्ही चवदार नाश्ता करू शकता. (Kanda Vada recipe) कांदा वडा ही रेसेपी करायला सोपी असल्यानं तुम्ही सकाळ्याच्या नाश्त्याला चपातीबरोबर खाण्यासाठी तर दुपारच्या जेवणाला तोंडी लावणीसाठी खाऊ शकता. (How to make kanda vada)

कुरकुरीत कांदा वडा कसा करायचा?

कांदे लांबट पातळ चिरून घ्या. नंतर त्यात एक वाटी रवा, एक वाटी तांदळाचं पीठ, ३ चिरलेल्या मिरच्या, चिरलेली कोथिंबीर घाला. अर्धा चमचा आलं-लसूण पेस्ट,मीठ, बेकींग सोडा आणि थोडं पाणी घालून हे मिश्रण एकजीव करा. या मिश्रणाचे वडे करून मंद आचेवर तळून घ्या. 

कांद्याच्या सेवनाचे फायदे

१) डायबिटीस

मधुमेहाच्या रुग्णांसाठी कांदा खूप फायदेशीर मानला जातो. रोज कांद्याचे सेवन केल्याने मधुमेह टाइप-2 रुग्णांमध्ये साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

२) सूज कमी होते

कांदा शरीराची जळजळ कमी करण्यास उपयुक्त आहे. खरं तर, कांद्यामध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते.

३) रक्ताची कमरता दूर होते

जर तुमच्यात लोहाची कमतरता असेल तर तुम्ही तुमच्या आहारात कांद्याचा समावेश करू शकता. कांदा लोह, फोलेट आणि पोटॅशियमच्या गुणधर्मांनी समृद्ध असल्याचे ओळखले जाते. कांद्याचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहते आणि लोहाची कमतरता दूर होते.

४) कांदा

कांदा संसर्ग रोखण्यासाठी उपयुक्त मानला जातो. कांद्यामध्ये अँटी-अॅलर्जिक, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, ज्यामुळे शरीराला अनेक प्रकारच्या संक्रमणांपासून वाचवता येते.

५) पचन

जर तुम्हाला पचनाची समस्या असेल तर कांद्याचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पचनक्रिया बळकट करण्यासाठी आणि पोट निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही कांदा सॅलडच्या स्वरूपात खाऊ शकता.

Web Title: Make Crispy Onion Vada using 2 onions; Easy recipe, sparkling option to eat with meals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.