उन्हाळ्याच्या दिवसात साबुदाणा, बटाटा, कैरी तर कोणी टोमॅटोचे पापड बनवतं. पापड, लोणची बनवण्यासाठी उन्हाळा हा उत्तम ऋतू आहे. उन्हाळ्याच्या दिवसात केलेले पापड जवळपास १ ते २ वर्ष तुम्ही टिकवून ठेवू शकता. (How to make sabudana batata Papad) उपवासाला खाण्यासाठी किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी साबुदाणा बटाट्याचे पापड उत्तम पर्याय आहेत. साबुदाणा बटाट्याचे पापड करण्याची सोपी रेसिपी पाहूया. (Sabudana Potato Papad Recipe)
सगळ्यात आधी बटाटे उकडून सालं काढून घ्या. उकडलेल्या बटाट्यांमध्ये जास्त पाणी नसेल याची काळजी घ्या. हे बटाटे सालं काढून किसून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात साबुदाणे घालून बारीक करून घ्या. साबुदाण्याची बारीक पावडर बटाट्याच्या किसात घाला. यात जीरं, चिली फ्लेस, ओवा, कोथिंबीर घाला.
भाताबरोबर खायला करा गरमागरम उडपीस्टाईल टोमॅटो रस्सम; घ्या चटपटीत, आंबट-गोड रेसिपी
तेलाचा हात लावून मिश्रण व्यवस्थित एकजीव करा आणि हातानं लहान लहान गोळे बनवा. प्लास्टीकच्या कागदांना तेल लावून त्यावर हा गोळा ठेवून मध्यम आकाराचे पापड करा. १ ते २ दिवस उन्हात पापड व्यवस्थित सुकवून घ्या. त्यानंतर हे पापड तळायला तयार असतील.
उपवासाच्या वेळी साबुदाणा खाणे फायदेशीर मानले जाते कारण त्यात भरपूर स्टार्च असते ज्यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. उपवासादरम्यान याचे सेवन केल्यानं शरीर निरोगी राहण्यास मदत होते. साबुदाणे त्वचेसाठी खूप चांगले आहेत. त्यात जस्त, तांबे आणि सेलेनियम आढळतात. या तिन्ही गोष्टी त्वचेसाठी खूप चांगल्या आहेत.