हिवाळ्यात मुळा खाण्याचे फायदे अनेक आहेत. आरोग्यासाठी मुळा खाणे खूप फायदेशीर मानले जाते. मुळ्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. जसे की भाजी, पराठे, लोणचे, कोशिंबीर इत्यादी. काहींना मुळ्यापासून बनवलेले पदार्थ आवडत नाही. अशावेळी त्यांच्यासाठी खास मुळ्याचे कोफ्ते बनवा. हे कोफ्ते खायला चविष्ट तर लागतातच शिवाय आरोग्यदायी असतात. चला तर मग या रेसिपीची कृती जाणून घेऊया.
मुळ्याचे कोफ्ते बनवण्यासाठी लागणारं साहित्य
मुळा
डाळीचे पीठ
टोमॅटो
हिरवी मिरची
हिरवी धणे
गरम मसाला
आले
लसूण
मिरची पावडर
हळद
धणे पावडर
जिरे
हिंग
मीठ
तेल
कृती
सर्वप्रथम २ पांढरे मुळे घ्या. ते चांगले धुवून - किसून घ्या. मुळ्याला पाणी सुटते, म्हणून पाणी काढून टाकण्यासाठी किस पिळून घ्या. किसलेला मुळा एका भांड्यात काढा त्यात सगळे मसाले मिक्स करा. शेवटी 4-5 चमचे बेसन घालून छोटे कोफ्ते तयार करा. कढईत तेल गरम करा, त्यात छोटे कोफ्ते तळून घ्या.
भाजी बनवण्यासाठी दुसऱ्या पॅनमध्ये थोडे तेल गरम करा. त्यात आलं लसूण पेस्ट टाका. त्यानंतर 4-5 हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो बारीक चिरून घाला. तेल गरम झाल्यावर त्यात थोडे जिरे आणि हिंग टाका. टोमॅटो भाजून झाल्यावर त्यात हळद, धणे आणि तिखट घालून भाजून घ्या. आता त्यात घट्ट आणि ताजे दही घाला. काही वेळाने त्यात पाणी घालून शिजवून घ्या.
उकळी आल्यानंतर सर्व कोफ्ते मिक्स करा. शेवटी मीठ आणि गरम मसाला घाला. भाजीवर झाकण ठेवून 3-4 मिनिटे शिजू द्या. अशा प्रकारे मुळ्याचे कोफ्ते रेडी. कोफ्त्यांना हिरव्या कोथिंबिरीने सजवा आणि सर्व्ह करा.