नाश्त्याला काही वेगळं खावंस वाटलं तर काय बनवावं सुचत नाही. पोहे, उपमा, इडली असे पदार्थ खाऊन कायम कंटाळा आलेला असतो. काहीतरी नवीन करायचं म्हटलं की आधी तयारी करून ठेवावी लागते. (Crispy Potato Snacks Recipe) पण पुरेसा वेळ मिळत नसल्यानं नेहमी बाहेरचे पदार्थ खाल्ले जातात. फक्त १ कच्चा बटाटा वापरून कुरकुरीत खमंग नाश्ता तुम्ही घरीच बनवू शकता. (How to make perfect Breakfast at home)
सगळ्यात आधी एका कढईत तेल गरम करायला ठेवा. त्यात जीरं, बारीक चिरलेली मिरची, तीळ आणि चिली फ्लेस घाला. एक ग्लास पाणी घालून हे मिश्रण उकळू द्या. पाण्याला उकळी आपल्यानंतर त्यात कच्च्या बटाट्याचा किस, १ वाटी रवा घाला. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
मिश्रणाचं शिऱ्याप्रमाणे टेक्स्चर झाल्यानंतर २ मिनिटांसाठी झाकून ठेवा. एका भांड्याला तेल लावून त्यात हे मिश्रण काढून घ्या. या मिश्रणाचे लहान लहान गोळे बनवून त्याला मेदूवड्याप्रमाणे आकार द्या. हे वडे कुरकुरीत, लालसर होईपर्यंत तळून घ्या. तयार आहे बटाट्याचा कुरकुरीत नाश्ता.
बटाट्याचे काप कसे बनवायचे?
सगळ्यात आधी भांड्यात तांदळाचे पीठ, तिखट, हळद आणि मीठ एकत्र करा. एका मोठ्या भांड्यात 3 कप पाणी घाला. बटाटे सोलून त्याचे पातळ काप करा. बटाट्याचे तुकडे करताच ते पाण्यात टाका. सर्व बटाटे कापून झाल्यावर तवा गरम करा. थोडे तेल घालून संपूर्ण भागावर पसरवा.
वाटणघाटण न करताही रोज करा चमचमीत भाज्या, ग्रेव्ही मसाला करण्याची ‘खास’ पद्धत, भाज्या होतील झटपट
गॅस मध्यम आचेवर ठेवा. बटाट्याचे काही तुकडे पाण्यातून काढा. किचन टॉवेल वापरुन, बटाट्याचे तुकडे थोडे कोरडे करा. थोडासा ओलावा राहूद्या जेणेकरून तांदळाचे पीठ स्लाइसच्या पृष्ठभागावर चिकटेल. कापलेल्या तांदळाच्या पिठात काप ठेवा. बटाट्याच्या तुकड्यांच्या दोन्ही बाजूनं तांदळाच्या पिठाने घोळवून घ्या. बटाट्याचे तुकडे तव्यावर ठेवा आणि तपकिरी होईपर्यंत तळा. नंतर बटाट्याचे काप उलटा.