महाराष्ट्रामध्ये भाकरी हा पदार्थ आपण बरेचदा खातो. भाकरी अत्यंत पौष्टिक असते तसेच करायला सोपी असते. (Make delicious crispy bhakri with mixed flour)भाकरीचे अनेक प्रकार आहेत. विविध पिठांचा वापर करुन भाकरी करता येते. ज्वारीची भाकरी करतात. तसेच बाजरीची भाकरी करतात. तांदळाची भाकरी तर घरोघरी केली जाते. भाकरी बरोबर पिठलं खातात. विविध भाज्या खातात. (Make delicious crispy bhakri with mixed flour)नुसती तूप भाकरीही छान लागते.
भाकरी साधी असते त्यामध्ये मसाले किंवा इतर काही पदार्थ घातले जात नाहीत. त्यामध्ये फक्त मीठ व पाणी घातले जाते. मात्र ही रेसिपी जरा वेगळी आहे. लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा पटकन काही तरी चविष्ट व पौष्टिक करायचे असेल तर, ही रेसिपी अगदीच करता येईल. झटपट होणारा हा पदार्थ बिना भाजीचाही खाता येतो. मिक्स पिठांची भाकरी अगदीच मस्त लागते.
साहित्यतांदळाचे पीठ, ज्वारीचे पीठ, बाजरीचे पीठ, मीठ, कसुरी मेथी, लाल तिखट, हळद, कांदा, कोथिंबीर, लसूण, आलं, जिरं, हिंग, तेल, पाणी, हिरवी मिरची
कृती१. एका परातीमध्ये तांदळाचे पीठ घ्या. त्यामध्ये तेवढेच बाजरीचे पीठ घाला. वाटी भर तांदळाचे पीठ वापरत असाल तर वाटीभरच इतरही पीठं वापरा. वाटीभर ज्वारीचे पीठ घाला. पीठं व्यवस्थित एकजीव करुन घ्या.
२. कोथिंबीर मस्त बारीक चिरा. पिठाच्या मिश्रणामध्ये घाला. तसेच हिरवी मिरची बारीक चिरुन त्यामध्ये घाला. वाटून घातली तरी चालेल. कांदा अगदी बारीक चिरा आणि मग मिश्रणामध्ये घाला. लसणाच्या पाकळ्या छान सोलून घ्या. मग जरा ठेचा आणि मिश्रणामध्ये घाला. हातावर कसुरी मेथी घ्या. चिरडा आणि मग पिठामध्ये टाका. मेथी कमी वापरा नाही तर भाकरी कडू होईल.
३. फोडणी पात्रामध्ये तेल घ्या. जरा गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं घाला. जिरे छान फुल्ले की त्यामध्ये हिंग घाला. किसलेले आले घाला. सगळं छान परतल्यावर गॅस बंद करा आणि त्यामध्ये चमचाभर हळद घाला. तिखट घाला. तिखट करपण्याआधीच फोडणी पीठांच्या मिश्रणामध्ये घाला आणि मस्त मिक्स करा. त्यामध्ये कोमट पाणी ओता आणि पीठ मस्त मळून घ्या. त्यामध्ये चमचाभर तूप घाला. साध्या भाकरीसाठी जसे पीठ मळता तसेच पीठ मळून घ्या.
४. भाकरी थापा नाही तर लाटा आणि मग तव्यावर लावा. मस्त खुसखुशीत होईपर्यंत परतून घ्या. तुपावर परतली तरी चालेल.