Join us

शाळेबाहेर मिळणारी वाळवून ठेवलेली कुरकुरीत मसाला कैरी आठवते? यंदा करुन पाहा कैरीची सुपारी घरीच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2023 18:32 IST

Make Dried crispy masala kairi at Home कैरीचा मुखवास किंवा कैरी सुपारी घरच्याघरी करण्याची सोपी कृती, आंबटतिखट वाळलेली कैरी-तोंडाला सुटते पाणी

उन्हाळा म्हणजे कैरीचा सिझन. कैरी म्हटलं की तोंडाला पाणी सुटलेच म्हणून समजा. कैरीचे अनेक पदार्थ बनवले जातात. कैरीची चटणी, कैरीचं लोणचं, कैरीचा ठेचा, हे पदार्थ जेवताना आपण तोंडी लावण्यासाठी घेतो. कैरीचे हे पदार्थ खाल्ल्याने जिभेला चटकदार चव येते. गावाकडे शाळेबाहेर चटपटीत मसाला कैरी मिळायची. कैरीचे लांब काप, त्यावर तिखट - मीठ मसाला.

ही कैरी खायला अतिशय भन्नाट लागायची. तशी चटपटीत मसाला कैरी खायची असेल, तर हा पदार्थ घरी नक्की ट्राय करा. याला कैरीचा मुखवास असे देखील म्हणतात. यात कैरीला मसाले लावून वाळवून साठवून ठेवण्यात येते. जेवताना तोंडी लावण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे(Make Dried crispy masala kairi at Home).

कैरीचा मुखवास बनवण्यासाठी लागणारं साहित्य

कैरी 

हळद 

काळी मिरी 

जिरं पावडर

पीठ -मीठ -पाणी आणि ५ मिनिटात करा जाळीदार घावन, मऊ लुसलुशीत घावनांची मजाच न्यारी..

सैंधव मीठ 

साधं मीठ 

काश्मिरी लाल तिखट 

पिठी साखर 

या पद्धतीने बनवा कैरीची सुपारी

सर्वप्रथम  कैरी धुवून पुसून घ्या. आता त्याची साल काढून घ्या, व त्याचे बारीक लांब काप करून घ्या. आंब्याची कोय न घेता वरचा भाग घ्यावा. कैरीचे हे काप एका परातीत घ्या, त्यात अर्धा चमचा हळद, काळी मिरी, एक चमचा जिरं पावडर, अर्धा चमचा सैंधव मीठ, अर्धा चमचा साधं मीठ, एक चमचा काश्मिरी लाल तिखट. तीन चमचे पिठी साखर घालून मिश्रण मिक्स करा.

ना पीठ मळायची झंझट ना पोळ्या लाटायची, करा गव्हाच्या पिठाचे झटपट धिरडे! चपातीला उत्तम पर्याय

मिश्रण तयार झाल्यानंतर एका परातीत पसरवून कडक उन्हात सुकवून घ्या. कैरीचे काप लांब ठेवावे, जवळ ठेऊ नये. कैरीचे हे काप २ ते ३ दिवसात वाळतात. अशा प्रकारे कैरीचा कुरकुरीत मुखवास रेडी. आपण हा पदार्थ वर्षभर साठवून ठेऊ शकता. यासाठी एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा.

टॅग्स :आंबासमर स्पेशलअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स