Lokmat Sakhi >Food > झटपट करा दुधी हलवा, पाहा दुधी हलव्याच्या २ रेसिपी-चवीला मस्त आणि करायला सोपा!

झटपट करा दुधी हलवा, पाहा दुधी हलव्याच्या २ रेसिपी-चवीला मस्त आणि करायला सोपा!

Make Dudhi Halwa in no time, check out 2 Dudhi Halwa recipes - delicious and easy to make : दुधी हलवा तयार करण्याच्या या दोन पद्धती तुम्हाला माहिती आहेत का? अगदी सोप्या आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2025 18:10 IST2025-04-04T18:09:34+5:302025-04-04T18:10:40+5:30

Make Dudhi Halwa in no time, check out 2 Dudhi Halwa recipes - delicious and easy to make : दुधी हलवा तयार करण्याच्या या दोन पद्धती तुम्हाला माहिती आहेत का? अगदी सोप्या आहेत.

Make Dudhi Halwa in no time, check out 2 Dudhi Halwa recipes - delicious and easy to make! | झटपट करा दुधी हलवा, पाहा दुधी हलव्याच्या २ रेसिपी-चवीला मस्त आणि करायला सोपा!

झटपट करा दुधी हलवा, पाहा दुधी हलव्याच्या २ रेसिपी-चवीला मस्त आणि करायला सोपा!

आपण अनेक प्रकारचे गोड पदार्थ तयार करतो. (Make Dudhi Halwa in no time, check out 2 Dudhi Halwa recipes - delicious and easy to make!)खीर असेल हलवा असेल शिरा असेल किंवा मग गुलाबजाम, जिलबी, आदी पदार्थ असतील, असे विविध पदार्थ घरोघरी केले जातात. या प्रत्येक पदार्थामध्ये आणखी काही प्रकार असतात. जसे की शिरा म्हटल्यावर साधा शिरा, पायनॅपल शिरा, केळीचा शिरा, शेवयांचा शिरा असे अनेक प्रकार येतात. (Make Dudhi Halwa in no time, check out 2 Dudhi Halwa recipes - delicious and easy to make!)खीर सुद्धा अनेक प्रकारची असते. असे विविध प्रकार चवीलाही वेगळे लागतात आणि त्यांच्या पाककृतीही वेगवेगळ्या असतात. 

हलव्यामध्येही अनेक प्रकार असतात. हलवा आणि खीर असे दोन शब्द बरेचदा सारख्या अर्थाने वापरे जातात. त्यामुळे काही जण हलवा आणि खीर एकाच पदार्थासाठी वापरतात. जसे की दुधी हलवा. दुधी हलव्याला काही जण दुधीची खीर असेही म्हणतात. हा हलवा दोन प्रकारे तयार करता येतो. आणि दोन्ही पद्धती छान सोप्या आहेत. पाहा कसा तयार कराल.

साहित्य 
दुधी, साखर, दूध, तूप, सुकामेवा, वेलची पूड

कृती
१. दुधी चांगला स्वच्छ धुऊन घ्या. त्याची सालं सोलून घ्या. मग तो किसून घ्या. छान बारीक किसा. थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवा म्हणजे त्याचा रंग बदलणार नाही.    

२. एका कढईमध्ये तूप घ्या. तुपावर सुकामेवा परतून घ्या. तुमच्या आवडीचा कोणताही मेवा वापरा. काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे. छान परतून झाल्यावर एका वाटीमध्ये काढून घ्या. 

३. त्याच कढईमध्ये चमचाभर तूप घ्या. त्यामध्ये किसलेला दुधी टाका. छान परतून घ्या. दुधी परतायला जरा वेळ लागेल. तो छान खमंग परतला गेला पाहिजे. दुधी परतून झाल्यावर त्यामध्ये कपभर दूध घाला. सतत ढवळत राहा. त्यामध्ये गरजेपुरती साखर घाला. सगळं छान घट्ट झाल्यावर त्यामध्ये थोडे आणखी दूध घाला. सुकामेवा घाला. वेलची पूड घाला. सगळं मस्त मिक्स करा.

खव्याचा वापर करूनही दुधी हलवा तयार केला जातो. सगळी रेसिपी सारखीच करायची, फक्त साखर घातल्यानंतर त्यामध्ये खवा घालायचा. खवा चवीला छान लागतोच आणि हलवा घट्ट होतो. दोन्ही हलव्यांची चव वेगळी लागते दोन्ही रेसिपी करून पाहा.       

 

Web Title: Make Dudhi Halwa in no time, check out 2 Dudhi Halwa recipes - delicious and easy to make!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.