उन्हाळा असो पावसाळा असो किंवा मग हिवाळा, काही थंड पदार्थ आपण सगळ्याच ऋतूंमध्ये खातो. जसे की आईस्क्रिम. हा एक असा पदार्थ आहे,जो कोणत्याही दिवशी खाता येतो. ( make Falooda at home, see the easy recipe)अर्थात उन्हाळ्यामध्ये त्याला जास्त डिमांड असते.मात्र इतरही दिवशी आईस्क्रिम खायला लोकांना आवडतेच. असाच आणखी एक पदार्थ आहे जो खाताही येतो आणि पिताही. त्यामध्ये आईस्क्रिम असते, सुकामेवा असतो आणि इतर अनेक पदार्थ असतात. ( make Falooda at home, see the easy recipe)असा पदार्थ म्हणजे फालुदा. दिसायला मस्त रंगीबेरंगी असा फालूदा बघितल्यावरच तोंडाला पाणी सुटायला लागते.
उन्हाळ्यामध्ये तर जागोजागी फालूदाच्या गाड्या लागलेल्या असतात. ( make Falooda at home, see the easy recipe)पण सध्या फालूदाच्या किंमती काहीच्या काहीच वाढल्या आहेत. हाफ ग्लास घ्यायचा म्हटले तरी खिशाला कात्री लागते. घरी फालुदा तयार करणे स्वस्तही आहे आणि सोपेही. पाहा कसा तयार कराल.
साहित्य
सब्जा, दूध, सुकामेवा, पीठी साखर, आईस्क्रिम, कस्टर्ड पावडर
१. एका पातेल्यामध्ये दूध तापवत ठेवा. ते जरा तापले की त्यामध्ये थोडी पीठी साखर घाला. गॅस कमी ठेवा. दूध आटवून घ्या.
२. सब्जा पाण्यामध्ये भिजत घाला. त्याला भिजून फुलायला जरा वेळ लागतो. त्यामुळे रात्रीच भिजत ठेवा.
३. काजू - बदाम आणि इतर तुमच्या आवडीचा सुकामेवा घ्या. त्याचे तुकडे करा.
४. एका भांड्यामध्ये कस्टर्ड पावडर घ्या. त्यामध्ये थोडी पीठी साखर टाका. पाणी टाकून ते मिश्रण जरा पातळ करा. त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. एक पॅन गरम करत ठेवा. तो जरा तापला की त्यामध्ये ते मिश्रण टाका आणि सतत ढवळत राहा.
५. ते मिश्रण जरा पीठासारखे घट्ट झाले की गॅस बंद करा. शेव यंत्राचा वापर करून त्यापासून शेवया तयार करा. एका खोल भांड्यामध्ये गार पाणी घ्या.त्यामध्ये त्या शेवया पाडा. जर हा खटाटोप करायचा नसेल तर बाजारात रेडिमेड फालूदा शेव मिळते ती वापरा.
४. आता एका ग्लासमध्ये तयार केलेली सगळी सामग्री मिक्स करा. सब्जा घाला, सुकामेवा घाला, त्यामध्ये आटवलेले दूध घाला. शेव घाला. आईस्क्रिम घाला. फालुदा झटपट तयार करता येतो.