भारतात विविध प्रकारचे लोणचे केले जाते. आंब्याचे केले जाते. मिरचीचे केले जाते. तसेच आवळ्याचे लोणचे फार चविष्ट लागते. (Make fresh mango pickle in just 15 minutes)लोणच्याचे जसे अनेक प्रकार आहेत, तसेच लोणचे करण्याच्याही अनेक पद्धती आहेत. घरोघरी वेगवेगळ्या पद्धतीने लोणचे केले जाते. फेसून केले जाते. वाटून केले जाते. पण लोणचे करायला फार वेळ लागतो. विकतची लोणची फारच गोड असतात किंवा मग अगदीच तिखट असतात. लोणचं असा पदार्थ आहे जो घरीच केला पाहिजे. (Make fresh mango pickle in just 15 minutes)कारण घरचाच मसाला छान लागतो. सध्या कैऱ्यांचा सिझन सुरू आहे. कैरीचे लोणचे घरी करण्यासाठी अगदीच योग्य वेळ आहे. जर लोणच्याची लेंदी प्रोसेस करायची नसेल तर, या पद्धतीने झटपट लोणचे करून पाहा. चवीला मस्त लागते आणि १५ मिनिटांमध्ये होऊन जाते.
साहित्य
कैरी, मेथी, मोहरी, मीठ, तेल, लाल तिखट, हळद, हिंग, बडीशेप
कृती
१. चांगली आंबट अशी कैरी घ्या. त्या कैरीच्या बारीक फोडी करुन घ्या. तुम्हाला जर किसलेले लोणचे आवडत असेल तर कैरी किसून घ्या. लांब फोडी आवडत असतील तर लांब फोडी करा. इतर कोणता आकार आवडत असेल तर तो करा. मात्र फोड फार जाड केली तर मसाला छान मुरत नाही. त्यानुसारच आकार ठेवा.
२. कैरीच्या केलेल्या फोडी एका परातीमध्ये घ्या. त्यामध्ये लाल तिखट घाला. मीठ घाला. तसेच हळद घाला. बडीशेप मिक्सरमधून फिरवा आणि त्याची केलेली पूडसुद्धा त्यामध्ये टाका. मसाले फोडींना सगळीकडे समान लागतील याची काळजी घेत हातानेच ते मिक्स करुन घ्या.
३. एका पॅनमध्ये आता लोणच्याचा बेसिक मसाला तयार करुन घ्या. त्यासाठी पॅनमध्ये मोहरी घ्या. त्यामध्ये मेथीचे दाणे टाका. दोन्ही पदार्थ मस्त परतून घ्या. बराच वेळ परता. चांगले खमंग व्हायला पाहिजे. नंतर एका ताटलीमध्ये काढा आणि गार करुन घ्या.
४. गार झाल्यावर मिक्सरमधून वाटून घ्या. तयार केलेली पूड कैरीच्या मिश्रणामध्ये टाका. सगळं छान एकजीव करुन घ्या.
५. एका कढईमध्ये थोडे तेल गरम करुन घ्या. फोडणी पात्र असेल तर ते वापरा. गरम केलेले तेल लोणच्यावर ओता आणि सगळं पुन्हा एकदा एकजीव करुन घ्या. लोणचे रात्रभरात मस्त मुरते. चवीला फारच छान लागते आणि टिकतेही बरेच दिवस.