सकाळचा नाश्ता हा पौष्टिक असावा असं आपण अनेक आहार तज्ज्ञांकडून ऐकलंच असेल. कारण नाश्ता आपल्याला दिवसभरात काम करण्याची ऊर्जा देते. सकाळी आपण साधारण पोहे, उपमा, असे पदार्थ खातो. परंतु, तेच तेच पदार्थ खाऊन बऱ्याच जणांना कंटाळा येतो. आपल्याला जर काहीतरी हटके नाश्ता खायची इच्छा होत असेल, तर आजच आलू उत्तप्पा ही रेसिपी ट्राय करून पाहा. ही रेसिपी चवीला तर उत्तम लागतेच यासह भरपूर भाज्यांचं पोषण देखील देते. ही रेसिपी टिफीनसाठी देखील बेस्ट ऑप्शन आहे. चला तर मग या पदार्थाची कृती जाणून घेऊयात.
आलू उत्तप्पा बनवण्यासाठी साहित्य
१ कप तांदूळ
२ उकडलेले बटाटे
१ चिरलेला कांदा
१ बारीक चिरलेला गाजर
१ कप बारीक चिरून घेतलेला कोबी
१ बारीक चिरलेली सिमला मिरची
२ हिरव्या मिरच्या
२ चमचे आले
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून काळी मिरी
चिली फ्लेक्स
चवीनुसार मीठ
कृती
आलू उत्तपम बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदूळ धुवून घ्या, त्यानंतर एका बाऊलमध्ये पाणी टाका त्यात हे तांदूळ ५ तास भिजत ठेवा. आता भिजवलेले तांदूळ, उकडलेले बटाटे, पाणी, आले आणि हिरवी मिरची मिक्सरमधून वाटून घ्या.
पीठ तयार झाल्यावर एका मोठ्या भांड्यात काढा. त्यात चिरलेली कोबी, गाजर, सिमला मिरची आणि कांदा, चिली फ्लेक्स, मीठ आणि मिरपूड घाला आणि मिश्रण चांगले एकत्र करा.
आता तवा गरम करा आणि तव्यावर पिठाला गोल आकारात पसरवून नीट सोनेरी रंग येऊपर्यंत भाजून घ्या. अशा प्रकारे टेस्टी आलू उत्तपम खाण्यासाठी रेडी.