Lokmat Sakhi >Food > एक कप साबुदाणा - एक किलो बटाट्याचे बनवा लच्छा पापड, क्रिस्पी पापड - टिकतील वर्षभर

एक कप साबुदाणा - एक किलो बटाट्याचे बनवा लच्छा पापड, क्रिस्पी पापड - टिकतील वर्षभर

Make Homemade Special Lachha Papad ना साबुदाणा भिजत ठेवण्याचं झंझट, ना बटाटा शिजवण्याचं टेन्शन, ही घ्या नवीन रेसिपी, लच्छा पापड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2023 05:59 PM2023-04-10T17:59:32+5:302023-04-10T18:00:47+5:30

Make Homemade Special Lachha Papad ना साबुदाणा भिजत ठेवण्याचं झंझट, ना बटाटा शिजवण्याचं टेन्शन, ही घ्या नवीन रेसिपी, लच्छा पापड

Make Homemade Special Lachha Papad | एक कप साबुदाणा - एक किलो बटाट्याचे बनवा लच्छा पापड, क्रिस्पी पापड - टिकतील वर्षभर

एक कप साबुदाणा - एक किलो बटाट्याचे बनवा लच्छा पापड, क्रिस्पी पापड - टिकतील वर्षभर

उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले की, प्रत्येक घरात पापड, लोणचे, कुरडई हे पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ साठवून ठेवल्यास वर्षभर टिकतात. जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी हे पदार्थ उत्कृष्ट लागतात. मार्केटमध्ये देखील हे पदार्थ सहस मिळतात. पण त्याची चव घरातल्यासारखी येत नाही. अनेकांकडे लच्छा पापड बनवले जाते.

बटाटा व साबुदाण्याचा वापर करून हा पापड तयार होतो. जे चवीला कुरकुरीत व कमी साहित्यात झटपट तयार होते. आपण जर नवीनच पापड बनवण्यासाठी शिकत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. योग्य प्रमाणात जर साहित्यांचा वापर केल्यास, हा पदार्थ कमी साहित्यात - कमी वेळात बनतो. व स्टोर करून ठेवल्यास वर्षभर टिकतो. चला तर मग या क्रिस्पी रेसिपीची कृती पाहूयात(Make Homemade Special Lachha Papad).

लच्छा पापड बनवण्यासाठी लागणारं साहित्य

साबुदाणा 

बटाटे 

जिरं 

चिली फ्लेक्स

उन्हाळ्यात एक ग्लास मसाला ताकाने ठेवा शरीराला कुल, आरोग्यासाठी उत्तम - चवीला चटकदार

पाणी 

सैंधव मीठ 

या पद्धतीने बनवा लच्छा पापड

सर्वप्रथम, कढईत एक कप साबुदाणा घालून भाजून घ्या, साबुदाणा जास्त भाजायचे नाही, थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात साबुदाण्याची पावडर तयार करा. आता ही पावडर एका पॅनमध्ये काढून घ्या, व त्यात ८ कप पाणी घालून मिश्रण ढवळत राहा. त्यावर झाकण ठेऊन उकळी येण्यासाठी ठेवा.

भजी तर आवडतात पण बेसन पचत नाही? करा ज्वारीची कुरकुरीत कांदा भजी, खा बिंधास्त पोटभर

दुसरीकडे १ किलो बटाट्याचे साल काढून घ्या, साल काढून झाल्यानंतर बटाट्याला धुवून घ्या, व बटाट्याचे लांब किस तयार करा. उकळी आल्यानंतर त्यात बटाट्याचे किस, एक चमचा सैंधव मीठ, घालून मिश्रण मिक्स करा. पाणी जर कमी पडले असेल तर त्यात आणखी २ कप गरम पाणी घालू शकता. मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यात १ टेबलस्पून जिरं, १ टेबलस्पून चिली फ्लेक्स, घालून मिश्रण मिक्स करा. अशा प्रकारे लच्छा पापडाचं बॅटर रेडी झालं आहे. 

आता एका पॉलिथीनला तेलाने ग्रीस करा. ग्रीस केल्यानंतर त्यावर लच्छा पापडचे मिश्रण पसरवा. दोन्ही बाजूने उन्हात वाळवून घ्या. अशा प्रकारे लच्छा पापड रेडी. आपण हे पापड तेलात तळून खाऊ शकता. या पापडांना स्टोर केल्यास हे १२ महिने चांगले टिकतील.

Web Title: Make Homemade Special Lachha Papad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.