रोजच्या नाश्त्याला नवीन काय बनवणार हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. नाश्त्याला पोहे, उपमा, इडली, डोसा हा पदार्थ बनवला जातो. अनेकांना नाश्त्याला इडली - डोसा हा पदार्थ आवडतो. मात्र, डोसा बनवण्याची पद्धत ही खूप मोठी आहे. डोस्याचं पीठ भिजव्ण्यापासून, मिश्रण बारीक करण्यापर्यंत त्याची पद्धत खूप मोठी असते. आपल्याला जर झटपट डोसा बनवायचा असेल तर, ब्रेडपासून देखील बनवू शकता. रोज रोजच्या त्याच नाश्त्याला कंटाळला असाल तर इन्स्टंट मसाला डोसा ही रेसिपी ट्राय करा. ब्रेडपासून तयार ही रेसिपी झटपट बनते. मुलांच्या डब्ब्यासाठी ही रेसिपी उत्तम ऑप्शन आहे. चला तर मग या झटपट पदार्थाची कृती पाहूयात..
इन्स्टंट मसाला डोसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य
डोसा बनवण्यासाठी
ब्रेड
तांदळाचं पीठ
रवा
दही
पाणी
फ्रुट सॉल्ट
डोसाच्या आतमधील मसाल्यासाठी
बटाटे
मोहरी
सुखी लाल मिरची
शेंगदाणे
कांदा
आलं
कढीपत्ता
हळद
लाल तिखट
पाणी
मीठ
कृती
सर्वप्रथम, ब्रेडचे काठ कापून ब्रेडचे बारीक काप करून घ्या. हे काप बाऊलमध्ये टाका. त्यात तांदळाचं पीठ, बारीक रवा, घट्ट दही, पाणी, मीठ टाका. आता हे संपूर्ण मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाका व बारीक वाटून घ्या. मिश्रण बारीक झाल्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या.
आता बटाट्याची भाजी बनवण्यासाठी, एक पॅन घ्या त्यात २ टेबलस्पून तेल टाका. त्यानंतर मोहरी, सुखी लाल मिरची, शेंगदाणे, कांदा, आलं, कढीपत्ता, हळद, लाल तिखट टाकून संपूर्ण मिश्रण मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात उकडलेले बटाटे टाका. आणि संपूर्ण मिश्रण मिक्स करा. मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यात थोडे पाणी आणि चवीनुसार मीठ टाका. आणि संपूर्ण मिश्रण चांगले मिक्स करा. अशा प्रकारे मसाला रेडी.
दुसरीकडे तयार ब्रेडच्या पिठात फ्रुट सॉल्ट टाका, आणि मिक्स करा. आता नॉन स्टिक तवा घ्या. तवा गरम झाल्यानंतर थोडे तेल टाका आणि ब्रेडच्या बॅटरपासून डोसा तयार करून घ्या. डोसावर तयार मसाला पसरवा. जशा प्रकारे आपण मसाला डोसा बनवतो त्याचप्रमाणे हा डोसा तयार करून घ्या. अशा प्रकारे ब्रेडपासून तयार झटपट इन्स्टंट मसाला डोसा खाण्यासाठी रेडी.