Lokmat Sakhi >Food > Summer Special : घरच्या घरी झटपट करा वाफेवरच्या तांदळाच्या पापड्या, भरपूर फुलणाऱ्या पापड्यांची सोपी रेसिपी…

Summer Special : घरच्या घरी झटपट करा वाफेवरच्या तांदळाच्या पापड्या, भरपूर फुलणाऱ्या पापड्यांची सोपी रेसिपी…

Summer Special : वर्षभर लागणाऱ्या तांदळाच्या पापड्या घरीच केल्या तर...पाहूयात तोंडात घातल्या की विरघळतील अशा तांदळाच्या वाफेवरच्या पापड्यांची सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2022 01:22 PM2022-03-27T13:22:44+5:302022-03-27T13:27:10+5:30

Summer Special : वर्षभर लागणाऱ्या तांदळाच्या पापड्या घरीच केल्या तर...पाहूयात तोंडात घातल्या की विरघळतील अशा तांदळाच्या वाफेवरच्या पापड्यांची सोपी रेसिपी...

Make instant homemade steamed rice husks, simple recipe for lots of blooming husks | Summer Special : घरच्या घरी झटपट करा वाफेवरच्या तांदळाच्या पापड्या, भरपूर फुलणाऱ्या पापड्यांची सोपी रेसिपी…

Summer Special : घरच्या घरी झटपट करा वाफेवरच्या तांदळाच्या पापड्या, भरपूर फुलणाऱ्या पापड्यांची सोपी रेसिपी…

Highlightsदोन ते तीन दिवस चांगले उन दिल्यावर पापड्या कडक वाळतात आणि तेलात टाकल्या की अतिशय छान बॉबीसारख्या फुलतातझटपट होणाऱ्या या तांदळाच्या पापड्या खायला जितक्या छान तितक्याच करायला सोप्या...

उन्हाळा म्हटला की वाळवणं ओघाने आलीच. सध्या आपण कितीही बिझी असलो आणि आपल्याकडे पूर्वीच्या महिलांप्रमाणे वाळवणं करण्यासाठी पुरेसा वेळ नसला तरी वर्षभर खायला लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या पापड्या आपल्याला लागतातच (Summer Special). या सगळ्यात आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या आणि झटपट होणाऱ्या पापड्या म्हणजे तांदळाच्या वाफेवरच्या पापड्या. खायला अतिशय सुंदर लागणाऱ्या आणि विकतच्या चिप्स किंवा इतर गोष्टींपेक्षा कधीही पौष्टीक असणाऱ्या या पापड्या घरात केल्या तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी आवडीने या पापड्या खाऊ शकतात. कधी भाजून, कधी तळून तर कधी कच्च्या पापड्याही छान लागतात. आमरस किंवा गोडाचे जेवण असले की ताटात तळण लागतेच. हल्ली विकत वाळवण घ्यायला गेलो तर त्याच्या किंमती खूप जास्त असतात. तसेच हे करताना कसे सामान वापरले असेल, स्वच्छता कितपत राखली असेल याबाबत आपल्याला माहिती नसते. पण उन्हाळ्यात दिवस मोठा असल्याने आणि उन चांगले असल्याने कमीत कमी साहित्यात या पापड्या पटकन होऊ शकतात. मग झटपट होणाऱ्या आणि वर्षभर लागणाऱ्या तांदळाच्या पापड्या घरीच केल्या तर...पाहूयात तोंडात घातल्या की विरघळतील अशा तांदळाच्या वाफेवरच्या पापड्यांची सोपी रेसिपी...

(Image : Google)
(Image : Google)

साहित्य - 

१. तांदूळ - ३ ते ४ वाट्या 
२. पापड खार - अर्धा चमचा
३. मीठ - १ चमचा
४. तीळ - १ चमचा 
५. जीरे - अर्धा चमचा 
६. पाणी- ३ ते ४ वाट्या

कृती - 

१. तांदूळ स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे.

२. सकाळी उठल्यावर अगदी कमी पाणी घालून हे तांदूळ मिक्सरमध्ये अगदी पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यायचे. जितके वाट्य़ा तांदूळ तितकेच पाणी घालून ही पेस्ट तयार करायची.

३. या मिश्रणामध्ये पापड खार, मीठ, जीरे आणि तीळ घालून पीठ हलवून घ्यावे. 

४. घरात पोहे खायच्या लहान आकाराच्या ज्या प्लेटस असतात त्यामध्ये हे पीठ पातळसर पसरुन घ्यायचे, त्या प्लेटला खाली तेल लावून घ्या.

५. एका मोठ्या पातेल्यात पाणी तापत ठेवायचे, त्यावर एक चाळणी ठेवून त्यामध्ये या तांदळाचे पीठ घातलेल्या प्लेटस ठेवायच्या. 

६. अर्ध्या मिनीटातच या पापड्या शिजतात. त्यामुळे अर्धा मिनीट झाला की या प्लेटस बाहेर काढायच्या.

७. त्यानंतर पापडीच्या कडा मोकळ्या करुन प्लेटसमधून पापड्या काढायच्या आणि कापडावर किंवा प्लास्टीकवर पापड्या वाळवायच्या. 

८. दोन ते तीन दिवस चांगले उन दिल्यावर पापड्या कडक वाळतात आणि तेलात टाकल्या की अतिशय छान बॉबीसारख्या फुलतात.


 

 

 

Web Title: Make instant homemade steamed rice husks, simple recipe for lots of blooming husks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.