Lokmat Sakhi >Food > 'असा' करा गुळाचा फक्कड चहा! दूध नासणार नाही, चहा पांचटही होणार नाही..

'असा' करा गुळाचा फक्कड चहा! दूध नासणार नाही, चहा पांचटही होणार नाही..

साखर टाळून आता गुळाचा चहा घेण्याकडे अनेकांचा कल आहे. पण गुळाचा चहा जमतंच नाही, अशी अनेकींची तक्रार असते. म्हणूनच तर ही घ्या गुळाच्या चहाची फक्कड रेसिपी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 07:18 PM2021-10-05T19:18:20+5:302021-10-05T19:19:22+5:30

साखर टाळून आता गुळाचा चहा घेण्याकडे अनेकांचा कल आहे. पण गुळाचा चहा जमतंच नाही, अशी अनेकींची तक्रार असते. म्हणूनच तर ही घ्या गुळाच्या चहाची फक्कड रेसिपी..

Make jaggery tea like this! Best recipe for jaggery tea | 'असा' करा गुळाचा फक्कड चहा! दूध नासणार नाही, चहा पांचटही होणार नाही..

'असा' करा गुळाचा फक्कड चहा! दूध नासणार नाही, चहा पांचटही होणार नाही..

Highlightsगुळाचा उत्तम चहा सहज बनवता येतो. फक्त त्यासाठी काही चूका टाळल्या पाहिजेत आणि गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत.

साखर खाल्ल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आपण सगळेच जाणतो. साखर नको म्हणून इतर सगळे गोड पदार्थ खाणं आपण एकवेळ टाळू शकतो. पण चहा नसेल तर कसं होणार... खूप नाही तरी सकाळचा चहा आणि रात्रीचा चहा अनेक जणांना हवाच असतो. साखरेशिवाय चहा पिण्यात काही मजा नाही. म्हणूनच तर मग चहा प्यायचा तर गुळाचा असा एक हेल्दी पर्याय आता प्रकर्षाने समोर आला आहे. त्यामुळेच हल्ली गुळाच्या चहाचे प्रस्थ जबरदस्त वाढले असून अनेक शहरात गुळाचा चहा बनवून देणारी दुकानेही थाटली गेली आहेत. गुळाचा उत्तम चहा आपल्या घरीही अगदी सहज बनवता येतो. फक्त त्यासाठी काही चूका टाळल्या पाहिजेत आणि गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत.

 

गुळाचा चहा पिण्याचे फायदे
- गूळ उष्ण असल्यामुळे आता येणाऱ्या थंडीच्या दिवसांत गुळाचा चहा पिणे फायद्याचे ठरते.
- गूळाचा चहा पिल्याने ॲनिमियाचा त्रास कमी होऊ शकतो.
- अनेक संसर्गजन्य आजारांपासून दूर राहण्यासाठी गुळाचा चहा फायदेशीर ठरतो.
- गुळामुळे पचन संस्थेचे कार्य सुधारते.
- कफ, खोकला किंवा श्वसनासंबंधी आजारांसाठीही गुळाचा चहा पिणे फायद्याचे ठरते.
- हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास ती गुळाच्या चहाने भरून निघू शकते.

 

कसा करायचा गुळाचा चहा?
- गुळाचा चहा करण्यासाठी सगळ्यात आधी पातेल्यात एक पाणी उकळायला ठेवा.
- पाण्याला उकळी येऊ लागताच त्यात चहा पावडर, किसलेलं आलं आणि आवडत असल्यास विलायची, गवती चहा किंवा तुमच्या घरात असलेला चहा मसाला टाका. यानंतर आता या पाण्यात गूळ घाला आणि चांगली उकळी येऊ द्या.
- त्याचवेळी दुसऱ्या पातेल्यात दूध तापवत ठेवा. 


- पाणी उकळले की ते गाळून कपात ओता. त्यानंतर आता त्याच कपात गरम दूध ओता.
- चमच्याने चहा हलवून चांगला एकत्र करून घ्या.
- हा चहा गरम गरमच प्यावा. कारण जास्तवेळ ठेवल्यास तो फाटण्याची शक्यता असते.
- गुळाचा चहा करताना ज्या भांड्यात चहा पावडर घालून पाणी उकळत आहोत, त्यात कधीच वरून दूध घालू नका. चहाचे पाणी कपात गाळल्यानंतरच त्यात वरून दूध टाका.  

 

Web Title: Make jaggery tea like this! Best recipe for jaggery tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.