Join us  

आंब्याच्या साली फेकू नका, करा कुरकुरीत वेफर्स! पदार्थ वाटेल वेगळा पण चव भारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2023 9:53 AM

How To Make Mango Skin Chips At Home : Homemade Recipe : यंदा आंब्याच्या साली फेकून न देता आपण त्यापासून कुरकुरीत, चटपटीत, मसालेदार वेफर्स बनवून ते स्टोअर करुन खाऊ शकता.

उन्हाळ्यांत येणारे आंबा हे फळ कोणाला आवडत नसेल असा एकही व्यक्ती या पृथ्वीवर नसेल. आंबा म्हटलं की कित्येकांच्या तोंडाला पाणी सुटत. आंब्यांच्या सिजनमध्ये प्रत्येक दिवशी आंबा खाल्ल्याशिवाय आंबाप्रेमींचा एकही दिवस जात नसेल. आंबा खाताना आपण सहसा त्याची साल कचरा म्हणून फेकून देतो. पण ही आंब्याची साल हा आरोग्याचा खजिना आहे हे आपल्यापैकी बऱ्याचजणांना कदाचित माहित नसेल. आंबा खायला जसा गोड लागतो तसा तो आरोग्यासाठी देखील उपयुक्त असतो. 

 उन्हाळ्यात आंबा खायला प्रत्येकाला आवडतो. आंबा आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो. आंब्याच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे होतात. रस, ज्यूस, शेक अशा वेगवेगळ्या प्रकारे आंब्याचे सेवन केले जाते. आंबा हे फळ कच्चे आणि पिकलेले अशा दोन्ही प्रकारात खाल्ले जाते. कच्च्या आंब्याचे लोणचे करून ते वर्षभर खाल्ले जाते. केवळ आंबाच खायलाचा रुचकर लागत नाही तर त्याची साल देखील अनेक गुणांनी उपयुक्त आहे. रोजच्या जीवनात या आंब्यांच्या साली वेगवेगळ्या पद्धतीने वापरात आणता येतात. यंदा आंब्याच्या साली फेकून न देता आपण त्यापासून कुरकुरीत, चटपटीत, मसालेदार वेफर्स बनवून ते स्टोअर करुन खाऊ शकता(How To Make Mango Skin Chips At Home : Homemade Recipe).

साहित्य :- 

१. आंब्यांच्या साली - २ ते ३ कप (उन्हात ३ ते ४ दिवस वाळवून घेतलेल्या)२. काळं मीठ - १ टेबलस्पून ३. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून ४. काळीमिरी पूड - १/२ टेबलस्पून ५. तेल - ४ ते ५ टेबलस्पून

शहाळ्याचं पाणी आणि मलईचं गारेगार मिल्कशेक पिऊन तर पाहा, उन्हाळा आवडायला लागेल... 

कृती :- 

१. सर्वप्रथम आंब्याच्या साली काढून घ्याव्यात. या साली एका डिशमध्ये पसरवून उन्हात व्यवस्थित ३ ते ४ दिवस वाळवून घ्याव्यात. (आंब्यांच्या सालीतील पाण्याचा अंश संपूर्णपणे निघून गेला आहे याची खात्री करुन घ्यावी.)२. एका बाऊलमध्ये प्रत्येकी १ टेबलस्पून काळं मीठ, लाल तिखट मसाला, काळीमिरी पूड घालून सगळे जिन्नस एकजीव करुन मसाला तयार करुन घ्यावा. 

कैरी-कोथिंबीर-आणि पुदिन्याची चटकदार आंबट-गोड चटणी खाऊन तर पाहा, सोपी रेसिपी-तोंडाला सुटेल पाणी...

३. आंब्यांच्या साली संपूर्णपणे वाळवून घेतलेल्या साली गरम तेलात वेफर्स सारख्या गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्याव्यात. ४. आता या तळलेल्या आंब्यांच्या साली एका डिशमध्ये काढून त्यावर तयार करुन घेतलेला मसाला भुरभुरवून घ्यावा. ५. त्यानंतर हा मसाला त्या आंब्यांच्या सालींना व्यवस्थित लागण्यासाठी वेफर्स हलक्या हाताने हलवून घ्यावेत. 

आंब्यांच्या सालींचे कुरकुरीत वेफर्स खाण्यासाठी तयार आहेत. हे चटपटीत, मसालेदार वेफर्स आपण संध्याकाळच्या चहासोबत हलका - फुलका नाश्ता म्हणून खाऊ शकतो.

टॅग्स :अन्नपाककृती