भारताच्या प्रत्येक राज्याची खाद्यसंस्कृती ही वेगळीच नाही तर परिपूर्ण आहे. दक्षिण भारतीय पदार्थ भारतभरात सगळीकडेच खाल्ले जातात. (make perfect Rassam see this recipe , delicious south dish)नाश्त्याला इडली, सांबार, डोसा, मेदू वडा, असे पदार्थ तयार केले जातात. हे सगळे पदार्थ दाक्षिणात्यच आहेत. असाच एक पदार्थ आहे जो अत्यंत साधा आहे आणि तयार करायलाही सोपा आहे. तो म्हणजे रस्सम. (make perfect Rassam see this recipe , delicious south dish)मात्र आपण रस्सम म्हणून आमटीच तयार करतो. त्यामुळे त्याची चव पारंपारिक रस्सम सारखी लागत नाही.
साऊथ इंडस्ट्रीच्या कलाकारांना आवडा पदार्थ विचारला की बरेच जण रस्समच सांगतात. (make perfect Rassam see this recipe , delicious south dish)दीपिका पादुकोणचा सगळ्यात जास्त आवडता पदार्थ रस्समच आहे. रस्सममध्ये वापरले जाणारे पदार्थ शरीरातील उष्णता वाढू देत नाहीत, तसेच रस्सम पोटभरीचा असतो. या उन्हाळ्या रस्सम भाताचा आस्वाद नक्कीच घ्या.
साहित्य
टोमॅटो, पाणी, मीठ, चिंच, जिरं, लसूण, काश्मीर लाल मिरची, तेल, कडीपत्ता, हिंग, मोहरी, रस्सम मसाला, कोथिंबीर, हळद, काळी मिरी, मेथीचे दाणे
कृती
१. टोमॅटोचे तुकडे करून घ्या. एका पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवा. जरा उकळी आली की त्यामध्ये टोमॅटो टाका. त्यामध्ये चमचाभर मीठ घाला. रस्सम पातळच असतो. त्यामध्ये डाळींचा वापर केला जात नाही. त्यामुळे जर ४ टोमॅटो घेत असाल तर दोन कप भरून पाणी वापरा.
२. टोमॅटोची सालं निघायला लागली की गॅस बंद करा. पाणी व टोमॅटो गार करत ठेवा.
३. मिक्सरच्या भांड्यामध्ये काळी मिरी घ्या. त्यामध्ये सुकी लाल मिरची तसेच थोडेसे मेथीचे दाणे घाला. लसणाच्या काही पाकळ्या घाला. जिरं घाला. त्याचे वाटण तयार करून घ्या. जरासे पाणी वापरले तरी चालेल.
४. गरम पाण्यामध्ये चिंच भिजवा. तिचा कोय तयार करून घ्या. बिया व चोथा काढून टाका.
५. टोमॅटो गार झाल्यावर हातानेच ते कुसकरा. पातेल्यांतील पाण्यातच कुसकरायचा. व्यवस्थित कुसकरून झाल्यावर चोथा काढून टाका. टोमॅटोच्या पाण्यामध्ये हळद घाला. चिंचेचा कोय घाला. आणि ते छान उकळू द्या.
६. एकीकडे फोडणी तयार करून घ्या. तेल गरम करा त्यामध्ये कडीपत्ता टाका तो तडतडला की मग हिंग टाका मोहरी टाका आणि तयार केलेले वाटण टाका.
४. टोमॅटोच्या पाण्यामध्ये रस्सम मसाला घाला. मीठ घाला. तयार वाटण घाला. सगळं छान उकळू द्या. शेवटी कोथिंबीर छान बारीक चिरून घाला.